शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
15
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
16
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
17
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
18
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
19
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
20
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी

भारत-पाककडून परस्परांच्या भूमीवर तपास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 00:59 IST

मोदी सरकारने पाकिस्तानच्या तपास चमूला पठाणकोट हवाईतळात प्रवेशाची संधी दिली असतानाच राष्ट्रीय तपास संस्थेचा चमू (एनआयए) पाकिस्तानला लवकरच भेट देणार असल्याचे

- हरीश गुप्ता, नवी दिल्लीमोदी सरकारने पाकिस्तानच्या तपास चमूला पठाणकोट हवाईतळात प्रवेशाची संधी दिली असतानाच राष्ट्रीय तपास संस्थेचा चमू (एनआयए) पाकिस्तानला लवकरच भेट देणार असल्याचे समीकरण जुळवून आणण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समजते.जानेवारीमध्ये पठाणकोट येथे अतिरेक्यांनी हल्ला केल्यापासून तपासाचा मुद्दा भिजत घोंगडे बनला होता. भारतीय तपास संस्थेच्या चमूलाही पाकला भेट देण्याला मुभा दिली जावी यासाठी पाकिस्तानच्या सुरक्षा संस्थेने सहमती दर्शविल्याचे संकेत मिळाले आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ले. जन. नासीर खान जान्जुआ यांच्यातील दीर्घ चर्चेचे हे फलित मानले जाते. डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचेही मन वळवावे लागले. विदेशमंत्री सुषमा स्वराज या पाकच्या तपास चमूला भारतभेटीची परवानगी देण्याला अनुकूल होत्या. भारताच्या पावलावर पाऊल ठेवत पाकिस्तानकडूनही प्रतिसाद मिळू शकतो. हवाईतळावरील प्रवेश मर्यादित...पाकिस्तानच्या तपास चमूला पठाणकोटच्या हवाईतळावरील क्षेत्रात ठराविक भागापुरताच प्रवेश मर्यादित राहणार आहे. पठाणकोट हल्ल्याचा डाव साधण्यात पूर्णपणे यश मिळवता आले नसले तरी, पाकिस्तानच्या प्रशिक्षित अतिरेक्यांनी भारतात घुसून विध्वंस कसा घडवून आणला, या अनुषंगाने तपासाला परवानगी देण्यामागे डोवाल यांचे कौशल्य आणि प्रयत्न असल्याचे मानले जाते. भारतीय उपखंडात दहशत पसरविणाऱ्यांविरुद्ध लढा देण्यात पाकिस्तानने प्रामाणिकपणा दाखवावा, असे पटवून देण्यात डोवाल यांना यश मिळाले.एनआयए देणार लवकरच भेटपाकिस्तानच्या तपास पथकाने पाकिस्तानात परतून अहवाल पाठविल्यानंतर पठाणकोट हल्ल्यात सहभागी अतिरेक्यांच्या काही संशयित पाकिस्तानी नागरिकांशी असलेल्या संबंधाबाबत एनआयएकडून तपास केला जाणार आहे. अद्याप पाकिस्तानने या भेटीच्या तारखा निश्चित केलेल्या नाहीत.आयएसआयकडून अनुकूलता...बदलत्या परिस्थितीत कोणताही करार न करता भारतासोबत सहकार्याचे नवे पर्व सुरू करण्यामागे पाकिस्तानच्या सरकारसोबतच आयएसआय या पाकिस्तानी आंतरगुप्तचर सेवा संस्थेची भूमिका महत्त्वाची राहिल्याचे दिसते.