शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'इंडिया' आघाडीच्या लोगोचं मुंबईत अनावरण; सर्वांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 17:05 IST

इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी ही शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे.

नवी दिल्ली: विरोधी आघाडी I.N.D.I.A.ची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्यामुंबईत होणाऱ्या बैठकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत नवा लोगोही जाहीर होणार आहे. याबाबत आघाडीत सामील झालेल्या पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनुसार, या लोगोमध्ये तिरंग्याचे सर्व रंग असतील. भगवा, पांढरा, निळा आणि हिरवा. हा लोगो इटालिक फॉन्टमध्ये असेल. या प्रक्रियेत आतापर्यंत एकूण ९ लोगो तयार करण्यात आले आहेत. मात्र बहुतांश पक्षांना यातील एकच लोगो आवडल्याचे सांगण्यात येत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी ही शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष समन्वयाने बैठकीच्या आयोजनाच्या तयारीत लागले आहेत. मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

३१ ऑगस्ट रोजी लोगो जाहीर होईल

युतीच्या सर्व प्रमुख पक्षांना अंतिम लोगो दाखवला जाणार आहे. मुंबई सभेच्या सुरुवातीलाच लोगोवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असून ३१ ऑगस्टलाच लोगोचे अनावरण होणार आहे.

११ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार 

मुंबई बैठकीत स्थापन करण्यात आलेल्या ११ सदस्यीय समितीमध्ये शिवसेना, सपा, राष्ट्रवादी (शरद पवार गट), तृणमूल काँग्रेस, डावे, द्रमुक या प्रमुख पक्षांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असेल.

कोणताही जाहीरनामा नसेल

निवडणुकीत उतरताना या आघाडीचा कोणताही जाहीरनामा असणार नाही, हे विशेष. मात्र, निवडणुकीपूर्वी संयुक्त अजेंडा निश्चितपणे जाहीर केला जाईल. यावरही मुंबई बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबई बैठकीत 'इंडिया' युतीचा ६ सूत्री अजेंडा सामायिक केला जाईल.

ईशान्येतील काही पक्ष महायुतीत सामील होतील-

या बैठकीची माहिती देताना उद्धव गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, 'इंडिया' आघाडीच्या आगामी बैठकीत नवीन लोगोचे अनावरण केले जाईल. त्यांच्या मते, या लोगोमध्ये भारताशी संबंधित एक झलक दिसेल. या लोगोमध्ये या देशाला एकसंघ राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. संजय राऊत यांनी सांगितले की, जगभरातील ३८ पत्रकार येणार आहेत. या बैठकीबाबत सर्वच पक्षांमध्ये उत्सुकता आहे. यासोबतच ईशान्येतील काही नवीन पक्षही आमच्या आघाडीत सामील होऊ शकतात, असे संजय राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र