शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 06:10 IST

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतविरोधी भूमिका अधोरेखित करणाऱ्या कृती करण्याचा धडाका लावला आहे.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतविरोधी भूमिका अधोरेखित करणाऱ्या कृती करण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी भारत मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून (आयएसए) अमेरिकेला बाहेर काढले आहे. त्याचबरोबर रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दंडात्मक शुल्क लावण्याचा इशारा देणाऱ्या कायद्याला पाठिंबा दिला आहे. या त्यांच्या दोन्ही कृतींमुळे भारताला थेट लक्ष्य करण्यात आले आहे. 

आयएसएमधून अमेरिकेचा बाहेर पडण्याचा निर्णय या महिन्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या आदेशानंतर घेण्यात आला आहे. सौरउर्जेला प्रोत्साहन देणारी व भारतात मुख्यालय असलेली आयएसए ही प्रमुख बहुपक्षीय संस्था या व्यापक आढाव्याची एक बळी ठरली.

भारताला पुन्हा धमकी; ५००% टॅरिफ लावू

रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा प्रस्ताव असलेल्या एका वादग्रस्त विधेयकालाही ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. सवलतीच्या दरातील रशियन कच्च्या तेलाच्या सर्वांत मोठ्या आयातदारांपैकी एक असलेल्या भारतालाच यामागील प्राथमिक लक्ष्य मानले जात आहे.

विश्वासाच्या जागी व्यावहारिक दबाव

या कृती ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिका-भारत संबंधांमध्ये असलेल्या धोरणात्मक सौहार्दापासून बदलाचे संकेत देतात. भागीदारीऐवजी, भारताकडे समस्या म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकन व्यवस्थेचा गैरफायदा घेणे, पाश्चात्य निर्बंधांचे उल्लंघन करणे आणि ट्रम्प ज्या बहुपक्षीय मंचांचा तिरस्कार करतात, त्यांचा फायदा घेतल्याचे आरोप आता केले जात आहेत. भारतासाठी संदेश स्पष्ट आहे -  ट्रम्प २.०च्या राजवटीत, धोरणात्मक विश्वासाची जागा व्यावहारिक दबावाने घेतली आहे.

काम थांबणार नाही : भारत

ट्रम्प यांनी 'आंतरराष्ट्रीय सौर युती' या भारताच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा सौर युतीच्या ध्येयावर कोणताही परिणाम होणार नाही, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. १२५ सदस्य देशांच्या मदतीने सौर ऊर्जेच्या माध्यमातून हवामान बदलाचे लक्ष्य गाठण्यासाठी भारत प्रवास सुरूच ठेवणार आहे. 

सौर युती कशासाठी?

स्थापना : २०१५ (पॅरिस हवामान परिषद - सीओपी २१)पुढाकार : भारत आणि फ्रान्स यांचा संयुक्त उपक्रम.मुख्यालय : गुरुग्राम (भारत).उद्देश : सौर ऊर्जेचा वापर वाढवून हवामान बदलाचा सामना करणे.विस्तार : सध्या १२५ सदस्य देश सहभागी.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Targets India Again; US Exits Solar Alliance.

Web Summary : Donald Trump's administration has withdrawn the US from the International Solar Alliance and may impose tariffs on countries buying Russian oil, impacting India significantly. These actions signal a shift from strategic partnership to practical pressure, but India vows to continue its solar energy goals.
टॅग्स :IndiaभारतDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदी