शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मंत्रालयाकडून मोठा इशारा! ओमायक्रॉन डेल्टाची जागा घेण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 17:25 IST

भारतातील 11 राज्यांमध्ये 101 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण.

नवी दिल्ली: आफ्रीकन देशात सापडलेल्या कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. अनेक देशात या व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. भारतातही याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत 11 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले असून, यांची संख्या 100च्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही महत्वाची माहिती दिली. 

डेल्टाची जागा घेणार ओमायक्रॉनआरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना लव अग्रवाल म्हणाले की, ओमाक्रॉन रुग्णांच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. राज्यात आतापर्यंत 32 प्रकरणे आढळून आली आहेत. तर, दिल्लीत 22 लोकांना याची लागण झाली आहे.  कोरोनाचा हा नवीन प्रकार आगामी काळात डेल्टा व्हेरियंटची जागा घेऊ शकतो. 

दररोज 10 हजार कोरोना केसेसते पुढे म्हणाले की, आतापर्यंत देशातील एकूण ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे. 11 राज्यांमध्ये 101 ओमायक्रॉन संक्रमित झाल्याची पुष्टी आहे. याशिवाय, मागील 20 दिवसांपासून दररोज 10,000 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. परंतु आता या नवीन ओमायक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

इतर देशांतील भितीदायक आकडेवारी

जगातील अनेक देशांनी ओमायक्रॉनला घातक मानण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः ब्रिटन आणि अमेरिकेत ओमायक्रॉनच्या नावाने लोक घाबरू लागले आहेत. Omicron ने UK मधील रेकॉर्ड मोडला असून, अमेरिकेतील परिस्थितीही सातत्याने बिघडत आहे. या देशांमध्ये प्रकरणे दुप्पट वेगाने वाढत आहेत. 

ब्रिटनमधील परिस्थितीमिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये गुरुवारी 883746 रुग्ण आढळल्याने येथे खळबळ उडाली आहे. बुधवारी आढळलेल्या बाधितांपेक्षा हा आकडा 10 हजारांनी जास्त आहे. म्हणजे बुधवारी ब्रिटनमध्ये सुमारे 78 हजार प्रकरणे आढळून आली होती. या वर्षी जानेवारीमध्ये यूकेमध्ये जवळपास 68 हजार प्रकरणे समोर आली होती. तर, ओमायक्रॉनची प्रकरणे 12 हजारांच्या जवळ पोहोचली आहेत. ही भयावहः आकडेवारी पासून आपल्याला आता सावध राहण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या