शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारत हा आशियातील सर्वात भ्रष्ट देश; फोर्ब्जचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 04:21 IST

काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचाराविरुद्ध प्रचार करून, केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांना देशातील भ्रष्टाचार संपविण्यात यश आलेले नाही, असेच फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचाराविरुद्ध प्रचार करून, केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांना देशातील भ्रष्टाचार संपविण्यात यश आलेले नाही, असेच फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे स्पष्ट झाले आहे. या मासिकातील वृत्तानुसार भारतात आजही प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि अन्य शेजारी राष्ट्रांपेक्षा भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारत खूपच पुढे आहे.या मासिकाने भारत हा आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट देश असल्याचे म्हटले आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने केलेल्या अहवालाच्या आधारे फोर्ब्जने हा निष्कर्ष काढला आहे. पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशपेक्षाही भारतात अधिक भ्रष्टाचार आहे, असे हा अहवाल म्हणतो.भारतामध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण ६९ टक्के आहे, असे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.आशिया खंडामध्ये भ्रष्टाचाराची समस्या खूपच भयानक असून, थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान, म्यानमार व भारत या पाच देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण खूपच अधिक आहे, असा निष्कर्ष सर्वेक्षणाच्या आधारे काढण्यात आला आहे. या पाच भ्रष्ट देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला असून, त्या खालोखाल व्हिएतनाम (६५ टक्के), थायलंड व पाकिस्तान यांचा क्रमांक लागतो, असे या अहवालातून दिसते. पाकिस्तानात भ्रष्टाचाराचे प्रमाण भारतापेक्षा २0 टक्के कमी म्हणजेच, ४० टक्के आहे, असे हा अहवाल म्हणतो.सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा,’ अशी घोषणा दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणीही भ्रष्टाचाराचा आरोप करू शकणार नाही, पण त्यांची ‘न खाने दूंगा’ ही घोषणा मात्र प्रत्यक्षात आलेली नाही, असेच अहवालातील निष्कर्षांमुळे म्हणावे लागेल. प्रशासनातील, तसेच राजकारणातील भ्रष्टाचार आजही संपलेला नाही वा कमी झालेला नाही, असाच याचा अर्थ आहे.हा सर्व्हे तब्बल १८ महिने सुरू होता. त्यात आशिया खंडातील १६ देशांमधील विविध विभागांत राहणाºया लोकांना प्रश्न विचारण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरोधात चालविलेल्या प्रयत्नांबद्दल ५३ टक्के लोकांनी या सर्व्हेमध्ये समाधान व्यक्त केले आहे.शाळाप्रवेश, रुग्णालये, ओळखपत्रे, पोलीस, तसेच अन्य सुविधांसाठी आम्हाला लाच द्यावी लागते, असे50%हून अधिक लोकांना सर्व्हेमध्ये सांगितले.

टॅग्स :IndiaभारतCorruptionभ्रष्टाचार