शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

CoronaVirus Vaccine: ‘कोवॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना स्वयंसेवकांचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:40 IST

नवी अडचण; एम्ससह अन्य केंद्रांवर सारखीच स्थिती

-  हरीश गुप्तानवी दिल्ली : भारत बायोटेक व आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सिन या स्वदेशी बनावटीच्या लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याकरिता पुरेशा संख्येने स्वयंसेवक उपलब्ध होत नसल्याने नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिल्लीतील एम्स तसेच देशातील इतर चाचणी केंद्रांवरच साधारण अशीच स्थिती आहे.कोवॅक्सिन या लसीच्या तिसºया टप्प्यातील चाचण्या देशातील १२ विविध केंद्रांमध्ये सध्या सुरू आहेत. या लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळावी म्हणून आयसीएमआरने केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. सुमारे १२०० ते १५०० स्वयंसेवकांची एम्समधील चाचणी केंद्राला आवश्यकता आहे. मात्र सध्या तिथे फक्त २०० स्वयंसेवकच उपलब्ध आहेत. देशात दक्षिणेकडील काही राज्ये सोडली तर अन्य राज्यांतल्या चाचणी केंद्रांमधील परिस्थितीही साधारण अशीच आहे.कोवॅक्सिन लसीच्या चाचण्यांची पुरेशा संख्येने स्वयंसेवक मिळत नसल्याच्या वृत्ताबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास या लसीच्या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. संजय राय यांनी नकार दिला. मात्र या लसीच्या तिसºया टप्प्यासाठी स्वयंसेवक हवेत असे पत्रक एम्सने आपल्या वेबसाइटवर या आठवड्यात झळकविले आहे. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्यातील काही स्वयंसेवकांना कोवॅक्सिन लसीचे दोन डोस देण्यात येतील. अनेक स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस दिला जाईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला सहा आठवडे लागतील. त्यानंतरच औषध महानियंत्रक या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्याबाबत विचार करतील.लस उपलब्ध होण्याच्या अतिप्रचारामुळे उदासीनताभारतात डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये एकाहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होणार असा अतिप्रचार आधीपासून झाला आहे. मात्र त्याचा विपरित परिणाम होऊन कोवॅक्सिनच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याकरता स्वयंसेवक आपले नाव नोंदविण्यास उत्सुक नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या