शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' मुद्द्यांवरून भारत चीनविरोधात जाण्याची शक्यता; ड्रॅगनच्या शेपटीवर पाय ठेवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 06:53 IST

दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती असली तरी प्रत्यक्षात तशी वेळ येण्याची शक्यता नसल्याची माहिती बीजिंग दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिली.

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली: भारत-चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांत लष्कर व राजनयिक स्तरावर जोरदार हालचाली सुरू असून भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्त्री व चीनचे परराष्ट्र राज्यमंत्री लुओ झाहुई यांच्यात बीजिंगमध्ये झालेल्या भेटीनंतर राजनयिक चर्चेस सुरुवात झाली. दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही चर्चा केली. हल्ल्याबद्दल भारतानं अत्यंत कठोर शब्दांत निषेध नोंदवला. लुओ झाहुई चीनचे भारतातील माजी राजदूत असून त्यांनीच स्वत:हून विक्रम मिस्त्री यांना चर्चेसाठी बोलावल्याचं समजतं. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती असली तरी प्रत्यक्षात तशी वेळ येण्याची शक्यता नसल्याची माहिती बीजिंग दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र भारत ६ जून रोजी झालेल्या बैठकीतील प्रस्तावावर ठाम आहे. त्यावेळी जैसे थे स्थिती बाळगण्यावर सहमती झाली होती.आशिया उपखंडात भारताचा प्रभाव वाढतो आहे. सात वर्षांत राजनयिक संबंधामध्ये भारतानं बदल केले. चीन याच प्रभावामुळे काहीसा अस्वस्थ झाला आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना भारतानं आश्रय दिला. मात्र चीनची दुखरी नस असलेला तैवान, हाँगकाँग येथील अल्पसंख्यांकावर होणारा अत्याचार व तिबेटवरून भारतानं आतापर्यंत चीनविरोधी भूमिका घेण्याचं टाळलं. मात्र यापुढे आमच्याकडून अशी अपेक्षा करू नका, इतक्य स्पष्ट शब्दांत राजनयिक चर्चेदरम्यान भारतानं स्पष्ट केलं होतं. 

मुत्सद्देगिरीत भारताची सरशीएका आयएफएस अधिकाऱ्यानं सांगितलं की, परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेनंतर भारतानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ६ जूनला ठरलेल्या भूमिकेचा उल्लेख केला; पण चिनी परराष्ट्र मंत्रालयानं जाणूनबुजून त्याचा उल्लेख टाळला. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत इथेच भारताची सरशी झाली. ६ जूनला नेमकं काय ठरलं, याचा उल्लेख वारंवार करूनच भारत आपली बाजू अजून ठामपणे मांडेल, असंही हा अधिकारी म्हणाला. स्थिती 'जैसे थे' ठेवण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं होतं. परंतु त्यानंतरही चिनी सैनिक या क्षेत्रातून मागे न हटल्यानं कर्नल संतोष त्यांना जाब विचारण्यास गेले. तेव्हाच चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. 

टॅग्स :chinaचीन