शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

अद्भूत..!! अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी झेप; पहिले 'पुन्हा वापरता येणारे' हायब्रीड रॉकेट लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 10:23 IST

India launches reusable hybrid rocket: या रॉकेटला RHUMI-1 असे नाव देण्यात आले आहे. स्टार्टअप कंपनी स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांनी संयुक्तपणे केले विकसित

India launches reusable hybrid rocket RHUMI-1: भारताने अंतराळ क्षेत्रात एक मोठी अद्भूत कामगिरी करुन दाखवली आहे. भारताने आज एक असे रॉकेट अंतराळात लाँच केले, जे पुन्हा वापरता येणार आहे. याला हायब्रिड रॉकेट म्हटले असून हे आज सकाळी यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. या रॉकेटला RHUMI-1 असे नाव देण्यात आले असून ते तामिळनाडूस्थित स्टार्टअप कंपनी स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. चेन्नईच्या थिरुविदनाधाई येथून मोबाईल प्रक्षेपणाच्या मदतीने पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रीड रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले. रॉकेटने ३ क्यूब उपग्रह आणि ५० पीआयसीओ उपग्रह यशस्वीरित्या उप-कक्षीय मार्गावर ठेवले.

रुमी-1 मुळे रॉकेट प्रक्षेपणाचा खर्च कमी होणार!

हे रॉकेट पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट CO2 ट्रिगर पॅराशूट प्रणालीने सुसज्ज आहे. त्याच्या मदतीने रॉकेटचे विविध घटक सुरक्षितपणे परत येऊ शकतात. त्यामुळे अंतराळ प्रक्षेपणाचा खर्च कमी होणार आहे. अंतराळ क्षेत्राव्यतिरिक्त, हे हायब्रीड रॉकेट कृषी, पर्यावरण निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या कामांमध्येही मदत करेल. या रॉकेटची एअर फ्रेम कार्बन फायबर आणि ग्लास फायबरपासून बनलेली आहे. याशिवाय यात पायरो तंत्रज्ञानाद्वारे विकसित पॅराशूटही बसवण्यात आले आहे. रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात पाठवलेले तीन घन उपग्रह वैश्विक किरणोत्सर्ग, अतिनील विकिरण आणि हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेऊ शकतील.

स्पेस झोन वन कंपनीचे सीईओ आनंद मेगलिंगम यांनी सांगितले की, या रॉकेटच्या मदतीने किरणोत्सर्गाची पातळी, कंपन आणि तापमान आदी माहिती गोळा करता येणार आहे. या प्रकल्पात मदत केल्याबद्दल मेगलिंगम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे आभार मानले. हायब्रीड रॉकेटमध्ये असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही केला जाऊ शकतो, असा दावा आता केला जात आहे.

टॅग्स :Indiaभारतisroइस्रोTamilnaduतामिळनाडू