शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्यांत ‘एअर बबल’ अंतर्गत वाढ?; मागणी वाढल्याने पर्यायांची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 06:04 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून हवाई वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय बंदीमुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून हवाई वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय बंदीमुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी ‘एअर बबल’अंतर्गत आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्या वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत.कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय सेवा देण्यात अडचणी येत आहेत. केंद्र शासनाने अनेक देशांशी एअर बबल करार करून काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू ठेवली असली, तरी वाढत्या मागणीला सामावून घेण्यात अपयश येत आहे. एकीकडे हवाई वाहतूक क्षेत्र सावरत असताना सेवाविस्तार करण्यात अपयश आल्यास दूरगामी परिणामांना सामोरे जावे लागू शकते. ही बाब लक्षात घेऊन विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे.प्राप्त परिस्थितीत एअर बबल करार करून अधिकाधिक देशांत वाहतूक सुरू करणे, हा एकमेव मार्ग दिसत असल्यामुळे त्यादृष्टीने केंद्रीय पातळीवर पावले टाकली जात आहेत. त्यासाठी सर्व देशांशी चर्चा सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.एअर बबल म्हणजे काय?कोरोना काळात दोन देशांमध्ये तात्पुरती वाहतूक सुरू करण्यासाठी एअर बबल करार केला जातो. त्याअंतर्गत परस्पर सामंजस्याने विमान सेवा दिली जाते. त्याचा दोन्ही देशांतील विमान कंपन्यांना फायदा होतो.सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील निर्बंध तातडीने शिथिल होतील, अशी आशा नाही. त्यामुळे दुबई, सिंगापूर, फ्रान्स, यूके, अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका, कतार, सौदी अरेबिया, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाबरोबर असा करार करून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.