शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे! काेणीही वाईट उद्देशाने देशात आल्यास कारवाई- गृहमंत्री अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 06:21 IST

वैध कागदपत्रे नसल्यास सात वर्षे शिक्षा; इमिग्रेशन विधेयक लोकसभेत मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कोणीही वाटेल तेव्हा भारतात येऊन राहायला, हा देश धर्मशाळा नाही. व्यापार, शिक्षण व संशोधनासाठी येणाऱ्या लोकांचे स्वागत आहे. मात्र, वाईट उद्देश व अशांतता निर्माण करण्यासाठी देशात प्रवेश करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गुरुवारी गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल-२०२५ बुधवारी लोकसभेत मंजूर झाले. त्यावर चर्चा करताना केंद्र सरकार अवैध रहिवाशांविरोधात कडक धोरण राबवणार असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या विधेयकामुळे भारताला भेट देणाऱ्या प्रत्येक परदेशी व्यक्तीची अद्ययावत माहिती मिळणार आहे. स्थलांतर हा वेगळा विषय नसून तो प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे विविध मुद्यांशी निगडीत आहे. या विधेयकामुळे भारतात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे. भारतात कोण येतो व तो किती काळ येथे राहतो, हे देशाच्या सुरक्षेसाठी आम्हाला जाणून घेण्याचा अधिकार असल्याचे या विधयेकावर तीन तासांहून अधिक वेळ चर्चा करताना गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

देशाला विकसित राष्ट्र बनवण्यास होईल मदत

इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल-२०२५ हे विधेयक देशाची सुरक्षा मजबूत करण्यासोबत देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यास मदत करणार आहे. या विधेयकामुळे देशात येणाऱ्या प्रत्येक परदेशी व्यक्तीची अद्ययावत माहिती सरकारकडे असेल, असा दावा गृहमंत्र्यांनी केला.

...तर सात वर्षांचा कारावास

भारतात प्रवेश करणे, वास्तव्य करणे तसेच देशाबाहेर जाण्यासाठी बनावट पासपोर्ट किंवा व्हिसाचा वापर केल्याचे आढळल्यास संबंधिताला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा व दहा लाख रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे.

विधेयक जेपीसीकडे पाठवा : स्थलांतर व विदेशी नागरिकांशी संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी संबंधित विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाह