शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

भारताने हिंदी महासागरात दाखवली 'गगन शक्ती'; चिनी ड्रॅगनला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 11:22 IST

हिंदी महासागरात चीनकडून वारंवार मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. यावेळी हिंदी महासागरात हवाई दलानं लांब अंतरावरील क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.

नवी दिल्ली- हिंदी महासागरात चीनकडून वारंवार मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. यावेळी हिंदी महासागरात हवाई दलानं लांब अंतरावरील क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. चीन हिंदी महासागरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय हवाई दलाला क्षेपणास्त्र परीक्षणात मिळालेलं यश हा चीनसाठी एक प्रकारचा इशाराच आहे.सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, गगन शक्तीच्या सरावामुळे चीनचं सैन्यही हवाई दलाच्या टप्प्यात आलं आहे. त्यामुळे हवाई दल जवळपास 2000 किलोमीटर अंतरावरच शत्रूंना पळवून लावू शकणार आहे. गगन शक्तीच्या या सरावात ब्रह्मोस आणि हार्पून अशा क्षेपणास्त्रांसह सुखोई आणि जग्वार सारख्या विमानांनी सहभाग नोंदवत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. हवाई दलाच्या मते, पश्चिमी आणि पूर्व दोन्ही समुद्रांच्या क्षेत्रात युद्धसराव सुरू आहे. दक्षिण भारतातल्या समुद्रात या सरावादरम्यान Su-30MKI कॉम्बेट प्लेनसह ब्रह्मोस क्रूज क्षेपणास्त्राचाही वापर करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या क्षेत्राजवळूनच चीनचे जवळपास 80 टक्के व्यापारी जहाज ये-जा करत असतात. हवाई दलाच्या सरावामुळे हे स्पष्ट झालं आहे की, हिंदी महासागरात भारत ही एक मोठी शक्ती आहे. गेल्या काही काळापासून चीन हिंदी महासागरात जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी भारतानं हा युद्धसराव केला आहे. गगन शक्तीचा सराव हा युद्धाभ्यासासारखाच आहे. ज्यात पूर्ण ताकदीनिशी उतरलं जातं. या सरावाच्या माध्यमातून हिंदी महासागरात चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या मैत्रीला भारतानं एक प्रकारे इशारा दिला आहे. चीन ज्या प्रकारे म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवच्या हिंदी महासागरात सामर्थ्य वाढतो आहे, भारताकडूनही त्याच वेळी हा युद्धाभ्यास करण्यात आला आहे. 

टॅग्स :chinaचीनairforceहवाईदल