भारताने इराणवरील खनिज तेल अवलंबित्व केले कमी

By admin | Published: July 23, 2014 12:47 AM2014-07-23T00:47:17+5:302014-07-23T00:47:17+5:30

भारताने आपली तेलाची गरज भागविण्यासाठी इराणवरील अवलंबित्व कमी केले आहे. यात प्रयत्नपूर्वक 6 टक्क्यांची घट केली आहे.

India has reduced the dependence of Iranian oil on the mineral | भारताने इराणवरील खनिज तेल अवलंबित्व केले कमी

भारताने इराणवरील खनिज तेल अवलंबित्व केले कमी

Next
नवी दिल्ली : भारताने आपली तेलाची गरज भागविण्यासाठी इराणवरील अवलंबित्व कमी केले आहे. यात प्रयत्नपूर्वक 6 टक्क्यांची घट केली आहे. दुसरीकडे कोलंबिया तथा मेक्सिको यासारख्या देशांतून भारताने तेलाची आयात वाढविली आहे.
अधिकृत सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने 31 मार्च 2क्14 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात इराणहून 1.1 कोटी टन कच्चे तेल आयात केले होते. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात हे प्रमाण 1.314 कोटी टनाहून कमी होते. देशाच्या एकूण तेल आयात गरजेपैकी इराणचा वाटा 2क्13-14 मध्ये 5.81 टक्के एवढा राहिला. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात तो 7.11 टक्के एवढा होता.
अमेरिका तथा पाश्चात्य देशांनी इराणला बिल चुकते करण्यावर विविध प्रकारचे र्निबध लादले आहेत. त्यांच्याकडे जहाज मार्गातही अडथळे आणले जात आहेत. या पाश्र्वभूमीर भारत सातत्याने इराणहून कच्चे तेल आयात कमी-कमी करीत आहे. 2क्क्9-1क् मध्ये इराणहून 2.12 कोटी टन तेल आयात करण्यात आले होते. 2क्1क्-11 मध्ये यात घट होऊन ते 1.85 कोटी आणि 2क्11-12 मध्ये 1.81 कोटी टन झाले. अमेरिकेद्वारा र्निबध कडक केल्याने इराणहून तेल आयात 2क्12-13 मध्ये 1.314 कोटी टन राहिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 
तेलाची गरज भागविण्यासाठी भारत कोलंबिया, मेक्सिको यासारख्या देशांतून आयात वाढवीत आहे. 
 
42क्1क्-11 र्पयत भारतात सौदी अरेबियानंतर इराणहून सर्वाधिक तेल आयात होत असे; मात्र आता 2क्13-14 मध्ये इराण सहाव्या क्रमांकावर गेला आहे. सौदी अरेबिया अद्याप प्रथम क्रमांकावर कायम आहे. सौदीने 2क्13-14 मध्ये 3.82 कोटी टन तेल भारताला दिले. आयात तेलाच्या एकूण प्रमाणात याचा वाटा 2क्.18 टक्के एवढा होता.
 
4भारताने या काळात जगभरातील 35 देशांतून 18.92 कोटी टन कच्च्या तेलाची आयात केली होती. भारताला तेल पुरवठा करणा:या देशांत इराक दुस:या, कुवैत तिस:या, नायजेरिया चौथ्या आणि संयुक्त अरब अमिराती पाचव्या क्रमांकावर आहे.

 

Web Title: India has reduced the dependence of Iranian oil on the mineral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.