शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 12:50 IST

चीनने बुधवारी शिखराला नाव देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अरुणाचल प्रदेश हा आपल्या जांगनानचा भाग असल्याचे म्हटले आहे.

भारतानेअरुणाचल प्रदेशातील एका शिखराला नाव दिल्याने चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. यानंतर आता भारत आणि चीन यांच्यातील टेन्शन पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.  खरे तर, भारताने अरुणाचल प्रदेशातील एका शिखराला सहावे दलाई लामा त्सांगयांग ग्यात्सो यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णयाने चीनला चांगलीच मिर्ची लागली असून याला विरोध करत त्याने या भागावर पुन्हा एकदा आपला दावा सांगितला आहे. चीनने बुधवारी शिखराला नाव देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अरुणाचल प्रदेश हा आपल्या जांगनानचा भाग असल्याचे म्हटले आहे.

सहाव्या दलाई लामांचेच नाव का देण्यात आले? -नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या (NIMS) टीमने अरुणाचल प्रदेशातील 20,942 फूट उंच असलेल्या आणि नाव नसलेल्या शिखरावर यशस्वी चढाई केली. यानंतर संघाने या शिखराला सहावे दलाई लामा त्सांगयांग ग्यात्सो यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. 

एनआयएमएस (NIMS) संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करते आणि अरुणाचल प्रदेशातील दिरांगमध्ये स्थित आहे. शिखराचे नामकरण करण्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सहाव्या दलाई लामा यांचे नाव शिखराला देणे, ही त्यांचे योगदान आणि बुद्धीला आदरांजली आहे. सहावे दलाई लामा, त्सांगयांग ग्यात्सो यांचा जन्म 1682 मध्ये मोन तवांग प्रदेशात झाला होता.

काय म्हणाला चीन -यासंदर्भात प्रश्न विचारला असता, चिनी परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हणाले, ‘‘आपण जो प्रश्न केला आहे, त्यासंदर्भात मला माहिती नाही. व्यापक दृष्टीने बोलायचे झाल्यास, जांगनानचा प्रदेश हा चीनचा प्रदेश आहे आणि भारताने चीनच्या भूभागात तथाकथित अरुणाचल प्रदेश स्थापन करणे बेकायदेशीर आणि अवैध आहे."

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत