शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : देशात आतापर्यंत 95 कोटी लोकांचे लसीकरण, मार्चपूर्वी पूर्ण होईल 100 कोटींचा आकडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 19:51 IST

Corona Vaccination Updates : देशात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची लोकसंख्या सुमारे 94 कोटी आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या दोन डोसनुसार, सर्व प्रौढांना लसीकरण करण्यासाठी 188 कोटी डोस आवश्यक आहेत.

नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत देशातील 95 कोटी लोकांना कोरोना लसीची दोन्ही डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे. ज्याअंतर्गत आतापर्यंत 95 कोटीहून अधिक लोकांना कोरोना लस दिली गेली आहे. (India completes administration of 95 crore  COVID-19 vaccine doses)

याचबरोबर, त्यांनी पुढे लिहिले आहे की, देश आता 100 कोटी लसींच्या डोसकडे वाटचाल करत आहे. 95 कोटीहून अधिक लोकांना लसीचे डोस मिळाल्यानंतर, भारत नियोजित वेळेपूर्वी 100 कोटी लसीच्या डोसचे लक्ष्य गाठेल, असे अपेक्षित आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने मार्च 2022 पर्यंत 100 कोटी कोरोना लसीचे डोस देण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु आता जे आकडे समोर येत आहेत ते पाहता असे म्हणता येईल की हे लक्ष्य डिसेंबरपूर्वीच पूर्ण केले जाईल. याआधी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी 'वॅक्सिन मैत्री'साठी ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये अतिरिक्त लस निर्यात करण्याबाबत बोलले होते. ते म्हणाले होते की, देशातील नागरिकांच्या गरजा आधी आहेत, यानंतरच आम्ही निर्यात वाढवू.

विशेष म्हणजे, देशात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची लोकसंख्या सुमारे 94 कोटी आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या दोन डोसनुसार, सर्व प्रौढांना लसीकरण करण्यासाठी 188 कोटी डोस आवश्यक आहेत. लक्ष्य पूर्ण करण्यासाठी राज्यांना दररोज सरासरी 1.14 कोटी डोस द्यावे लागतील.

आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य सरकारांना जेवढे आवश्यक डोस लागतील, ते उपलब्ध करून दिले जातील. मात्र, डोसची उपलब्धता असूनही राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढत नाही. आतापर्यंत, देशातील 72 टक्के वयस्कर लोकांनी एक डोस घेतला आहे आणि सुमारे 25 टक्के वयस्कर लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य