शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

जीव गुदमरतोय! जगातील ३० पैकी २१ सर्वाधिक प्रदूषित शहरं भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 06:59 IST

सर्वाधिक अशुद्ध हवा असलेल्या ३0 शहरांतील २१ शहरे भारतीय

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी दोन तृतीयांश प्रदूषित शहरे भारतातील असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक अशुद्ध हवा असलेल्या ३० शहरांपैकी २१ शहरे भारतीय आहेत. चीनच्या शहरांनी आपल्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा केली असताना भारतीय शहरे मात्र अधिकाधिक प्रदूषित होत असल्याचेही अहवालातून समोर आले आहे.‘आयक्यूएअर एअर व्हिज्युअल्स’ या संस्थेने जारी केलेल्या ‘२०१९ जागतिक हवा शुद्धता अहवाला’त ही माहिती देण्यात आली आहे. अशुद्ध हवा असलेल्या सर्वोच्च १० शहरांतही ६ शहरे भारतातील आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.राजधानी दिल्लीचे सॅटेलाईट शहर म्हणून ओळखले जाणारे गाझियाबाद जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. २०१९ मध्ये येथील हवेतील ‘पीएम २.५’ संचयन ११०.२ होते. अमेरिकी पर्यावरण सुरक्षा संस्थेने प्रमाणित केलेल्या पातळीपेक्षा हे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त आहे. नोव्हेंबरमध्ये नवी दिल्लीतील हवा शुद्धता निर्देशांक ८०० पेक्षाही जास्त झाला होता, तेव्हा शहरात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. पीएम २.५ हे हवेतील अतिसूक्ष्म घातक कण मोजण्याचे परिमाण आहे. हे अतिसूक्ष्म कण फुफ्फुसात जाऊन श्वसन संस्था निकामी करतात.जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, प्रदूषित हवेमुळे जगात दरवर्षी ७ दशलक्ष लोकांचा अकाली मृत्यू होतो. शहरात राहणाऱ्या ८० टक्के लोकसंख्येला घातक हवेचा सामना करावा लागतो. प्रदूषित शहरांत दक्षिण आशियातील शहरांचे प्रमाण अधिक आहे. सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांतील २७ शहरे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील आहेत. पाकिस्तानातील गुजरनवाला, फैसलाबाद आणि राईविंद ही शहरे पहिल्या १० सर्वाधिक प्रदूषित शहरांत आहेत. नवी दिल्ली, लाहोर आणि ढाका ही शहरे अनुक्रमे ५ व्या, १२ व्या आणि २१ व्या स्थानी आहेत. दक्षिण आशिया, आग्नेय आशिया आणि पश्चिम आशिया या भूभागातील ३५५ शहरांपैकी केवळ ५ शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत भारत पाचव्या स्थानी आहे. या यादीत पहिले पाचही देश आशियातील आहेत.जगातील हवा प्रदूषण २0१९देश हवेची गुणवत्ता पीएम २.५ चे प्रमाणबांगलादेश अनारोग्यदायी ८३.३पाकिस्तान अनारोग्यदायी ६५.८मंगोलिया अनारोग्यदायी ६२अफगाणिस्तान अनारोग्यदायी ५८.८भारत अनारोग्यदायी ५८.१इंडोनेशिया अनारोग्यदायी ५१.७

टॅग्स :pollutionप्रदूषण