Donald Trump Decision On America H1B Visa: अमेरिकन ड्रीम पाहणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. नवीन निर्णयानुसार, आता H-1B व्हिसा मिळवण्यासाठी नवीन अर्जदारांना आणि जुन्या व्हिसा धारकांना नुतनीकरणासाठी १००,००० डॉलर्स (८८ लाख रुपये) भरावे लागतील. हा नवीन निर्णय भारतीयांसाठी मोठी आर्थिक अडचण निर्माण ठरू शकतो. याचा फटका २ लाख भारतीयांना बसू शकतो, असा कयास बांधला जात आहे. यातच भारतीय सरकारकडून याबाबतची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयानंतर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. सरकारने अमेरिकेच्या एच-१बी व्हिसा प्रोग्रामबाबत प्रस्तावित सर्व निर्बंधासंबंधी अहवाल पाहिले आहेत. या उपाययोजनांचे पूर्ण परिणाम सर्व संबंधितांकडून तपासले जात आहेत. यामध्ये भारतीय उद्योगाचाही समावेश आहे, ज्यांनी एच-१बी प्रोग्रामशी संबंधित काही दृष्टिकोनाबाबत स्पष्टीकरण देणारे सुरुवातीचे विश्लेषण यापूर्वीच जारी केले आहे. भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमधील उद्योगांची संशोधन आणि सर्जनशीलता यांमध्ये भागीदारी आहे. पुढे जाण्याच्या सर्वोत्तम मार्ग काय असेल यावर चर्चेची अपेक्षा केली जाऊ शकते, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
नुकत्याच घेतलेल्या निर्णयाचे मूल्यमापन करतील
कौशल्य प्रतिभा असणाऱ्यांची उपलब्धता आणि देवाणघेवाण याने अमेरिका आणि भारतातील तंत्रज्ञान विकास, संशोधन, आर्थिक वाढ, स्पर्धात्मकता आणि भांडवल निर्मितीमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे धोरणकर्ते परस्परांमधील मजबूत संबंधासह, परस्पर लाभांचा विचार करून नुकत्याच घेतलेल्या निर्णयाचे मूल्यमापन करतील. तसेच या उपायामुळे कुटुंबांसाठी निर्माण झालेल्या अडचणींमुळे मानवतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारला आशा आहे की, या समस्यांची अमेरिकेचे अधिकारी योग्य प्रकारे दखल घेतील, अशी अपेक्षा भारताकडून व्यक्त करण्यात आली आहे. H-1B व्हिसा घेणाऱ्या भारतीयांचे प्रमाण ७१ टक्के आहे.
दरम्यान, H-1B हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे, जो अमेरिकेत एखाद्या परदेशी व्यक्तीला स्पेशलिटी ऑक्युपेशन (विशेष कौशल्य असलेली नोकरी) करण्यासाठी दिला जातो. IT, इंजिनिअरिंग, फायनान्स, आर्किटेक्चर, मेडिकल, अकाउंटिंग इत्यादी क्षेत्रांसाठी हा दिला जातो. अमेरिकन कंपन्यांना उच्च शिक्षण घेतलेल्या किंवा विशेष कौशल्य असलेल्या परदेशी प्रोफेशनल्सना नोकरीवर ठेवण्यासाठी. परदेशी व्यक्तीला अमेरिकेत कायदेशीररीत्या काम करण्याची परवानगी मिळावी, यासाठी H-1B व्हिसा आवश्यक असतो. H-1B व्हिसा साधारण ३ वर्षे वैधता असते. ती ६ वर्षांपर्यंत वाढवता येते. अमेरिकेचा