नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थीत निर्माण झाली असून पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. काही देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तर कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट्स देखील पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान कोरोनाच्या संकटात भारत काही देशांसाठी देवदूत ठरला आहे. भारतात तयार करण्यात आलेली ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका व्हॅक्सीन 'कोविशील्ड' पाठवण्यात आली आहे.
जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. भारतात अत्यंत वेगाने कोरोना लसीकरण अभियान सुरू आहे. आतापर्यंत 25 लाखांहून अधिक लोकांना लस टोचण्यात आल्याची माहिती दिली आहे. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे भारत जगभरातील इतरही अनेक देशांना कोरोनाची लसीचे डोस पुरवत आहे.
"या" देशांत पाठवले कोरोना लसीचे डोस
बांगलादेश - 20 लाख डोस
म्यानमार - 15 लाख डोस
नेपाळ - 10 लाख डोस
श्रीलंका - 5 लाख डोस
भूतान - दीड लाख डोस
मालदीव - 1 लाख डोस
मॉरीशस - 1 लाख डोस
ओमन - 1 लाख डोस
सेशेल्स - 50 हजार डोस
"या" देशांत पाठवले जाणार आहेत डोस
अफगाणिस्तान - 5 लाख डोस
निकारगुआ - 2 लाख डोस
मंगोलिया - 1.5 लाख डोस
बारबेडोज - 1 लाख डोस
डॉमिनिका - 70 हजार डोस
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचण्यासाठी डबल मास्किंग म्हणजेच दोन मास्क लावा असा सल्ला आरोग्यविषयक तज्ज्ञांनी दिला आहे. दोन मास्क वापरण्याबाबतते व्हापासून चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील लोकप्रिय संसर्गजन्य विकार तज्ज्ञ अँथोनी फॉकी यांनी दोन मास्कचा वापर हा कॉमन सेन्सचा भाग असल्याचं म्हटलं आहे. सेलिब्रिटींनी केलेला दोन मास्कचा वापर आणि तज्ज्ञांचा सल्ला बघता वैज्ञानिक दृष्टीकोनातून दोन मास्कचा वापर खरोखर योग्य आहे का हे जाणून घेणे महत्वाचं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्यावर दोन मास्क लावल्याने आपले व्हायरसपासून संरक्षण होऊ शकतं. अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राने (सीडीसी) हा सल्ला औपचारिकपणे लागू केलेला नाही.
आरोग्यसंबंधी एका रिसर्च पेपरमध्ये तज्ज्ञ मोनिका गांधी आणि लिनसे मारने यांनी नागरिकांनी किमान उच्च दर्जाचा सर्जिकल मास्क किंवा दाट धाग्यांपासून बनवलेला मास्क वापरणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. दोन मास्कचा वापर केल्यामुळे व्हायरसपासून 50 ते 75 टक्के अधिक बचाव होऊ शकतो असं एका रिसर्चमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या संशोधनात सर्जिकल प्रकारच्या मास्कच्या पार्टीकल्स हटवण्याच्या क्षमतेवर अभ्यास करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात एन95 मास्कची उपलब्धता कमी असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कापडापासून तयार केलेला मास्क वापरावा, असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे नागरिक कापडाच्या मास्कचा वापर करण्याऐवजी एन95 मास्क वापरण्यावर अधिक भर देताना दिसत आहेत.