शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न दिल्याने इंडिया आघाडी पुन्हा एकवटली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:26 IST

लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट घेत व्यक्त केली सामूहिक नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा मुद्दा इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी गुरुवारी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या समक्ष उपस्थित केला. सभागृहात गांधीसंदर्भात केलेल्या वक्तव्य तसेच इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांसह विरोधकांनी सभापतींची भेट घेत त्यांना पत्र दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पत्रात विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे की, परंपरेनुसार जेव्हा जेव्हा विरोधी पक्षाचा नेता उभा राहतो तेव्हा त्याला सहसा बोलण्याची परवानगी असते. मात्र, सध्याच्या सरकारने औपचारिक विनंती करूनही विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी देण्यास नकार दिला आहे. हे पूर्वीच्या परंपरेपेक्षा वेगळे आहे, संघर्षाच्या परिस्थितीतही विरोधी पक्षनेत्याचे ऐकले जाते.

इंडिया आघाडीच्या प्रतिनिधी मंडळाने बिर्ला यांची भेट घेतली. यात काँग्रेस, सपा, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राजद व इतर काही पक्षांच्या खासदारांनी त्यांना निवेदन दिल्याचे काँग्रेस खा. गौरव गोगोई यांनी स्पष्ट केले. 

निवडणुकीच्या मुद्द्यावर खासदार विचार मांडणार

‘एक देश, एक निवडणूक’ची तरतूद असलेल्या दोन विधेयकांवर खासदार संसदेच्या संयुक्त समितीसमोर आपले विचार व दृष्टिकोन मांडू शकतात, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. विविध विषयांशी संबंधित झालेल्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये अनेक तरुण खासदारांनी एक देश, एक निवडणूक या विषायासंदर्भातील विचार माझ्यासमोर मांडले. नवीन खासदारांनी खूप चांगला युक्तिवाद केल्याचे बिर्ला म्हणाले.  

गृहमंत्र्यांविरोधील हक्कभंगाची नोटीस

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधातील हक्कभंगाची नोटीस फेटाळून लावली. काँग्रेसचा एक नेता पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीच्या व्यवस्थापनाचा भाग होता, असा दावा शाह यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी सभापतींकडे गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी