शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

भारतानं मैत्रीधर्म पाळला, कठीन काळातही इस्त्रायलसोबत उभा राहिला! गाझात युद्ध सुरू असताना केला ड्रोन, शस्त्रास्त्र पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 19:10 IST

गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून भारताने इस्रायलला तोफगोळे, वजनाने हलकी शस्त्रे आणि ड्रोनचा पुरवठा केला आहे...

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ८ महिन्यांपासून गाझापट्टीमध्ये जबरदस्त युद्ध सुरू आहे. या प्रदीर्घ युद्ध काळात इस्रायलच्या अनेक जुन्या मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली, मात्र भारत या कठीण काळातही त्याचा एक खरा मित्र बणून उभा आहे. गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासूनच भारताने इस्रायलला तोफगोळे, वजनाने हलकी शस्त्रे आणि ड्रोनचा पुरवठा केला आहे. अरबी मीडिया आउटलेट शफाक न्यूजने इस्त्रायली वृत्तपत्र येदिओथ अहनोथ (Yedioth Ahronoth) मधील वृत्ताच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारत इस्रायलला हैदराबादमध्ये तयार झालेले 'हर्मीस 900' ड्रोनचा पुरवठा करत असल्याची माहिती फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांद समोर आली. 

भारतीय लष्कराला इस्रायली ड्रोनच्या पुरवठ्यासाठी, इस्रायलच्या सहकार्याने हैदराबादमध्ये एक कारखाना सुरू करण्यात आला आहे. हा कारखाना, इस्रायली संरक्षण कंपनी एल्बिट सिस्टिम्स आणि भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनीसोबत एक संयुक्त उपक्रम म्हणून काम करतो. याच फॅक्ट्रीमधून गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायली सैन्यासाठी 20 ड्रोन पाठवण्यात आले. संबंधित वृत्तानुसार, हमाससोबत संघर्ष सुरू झाल्यपासून भारताकडून दारूगोळा आणि इतर शस्त्रास्त्रांचा होणारा पुरवठा, दोन्ही दोशांतील वाढती धोरणात्मक भागीदारी दर्शवतो. जी इस्रायलसाठी अत्यंत फायद्याची ठरली आहे. 

कारगिल युद्धात इस्रायलनं केली होती मदत - भारतातील इस्रायलचे माजी राजदूत डॅनियल कार्मन यांनी भारताच्या या सहकार्यामागील एका ऐतिहासिक घटनेचाही उल्लेख केला. जेव्हा इस्रायलने 1999 मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धादरम्यान भारताला महत्वपूर्ण लष्करी मदत केली होती.

अमेरिकेनेही हात मागे घेतले - इस्रायलचा सर्वात चांगला मित्र असलेल्या अमेरिकेनेही अलिकडच्या काळात शस्त्रास्त्र पुरवठा करण्यावर बंदी घातली आहे. असे असतानाच, भारत इस्रायलसोबत उभे राहणे महत्वाचे ठरते. महत्वाचे म्हणजे, अमेरिकन प्रशासन आपल्याला युद्धादरम्यान शस्त्रास्त्रे पुरवण्यावर बंदी घालत आहे, असा आरोप  इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी याच आठवड्यात केला आहे.

 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIndiaभारतAmericaअमेरिका