शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Prakash Javadekar: जय हो! कोरोना लसीकरणात भारतानं अमेरिकेला टाकलं मागे, आतापर्यंत ८.७० कोटी लोकांचं लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:03 IST

corona vaccination in India: India fastest in vaccination against Covid-19 USA also left behind Prakash Javadekar: कोरोना लसीकरणात भारताने अमेरिकेला मागे टाकलं असून भारत संपूर्ण जगात सर्वात वेगानं कोरोना विरोधी लसीकरण करणारा देश ठरला आहे

corona vaccination in india: कोरोना लसीकरणात भारताने अमेरिकेला मागे टाकलं असून भारत संपूर्ण जगात सर्वात वेगानं कोरोना विरोधी लसीकरण करणारा देश ठरला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. भारतात दर दिवशी सरासरी ३० लाख ९३ हजार ८६१ जणांचं लसीकरण सुरू आहे. तर आतापर्यंत देशात ८ कोटी ७० लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. India fastest in vaccination against Covid-19 USA also left behind Prakash Javadekar

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असताना लसीकरणात दुजाभाव का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा केंद्राला सवाल

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही याबाबतच एक ट्विट केलं आहे. कोरोना विरोधी लसीकरणात भारतानं अमेरिकेलाही मागे टाकून जगात अव्वल स्थान मिळवलं आहे, अशा आशयाचं ट्विट जावडेकर यांनी केलं आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत ८ कोटी ७० लाख ७७ हजार ४७४ कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. 

कुणाला किती डोस मिळाले?देशात आतापर्यंत ८९ लाख ६३ हजार ७२४ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ५३ लाख ९४ हजार ९१३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देखील घेतला आहे. फ्रंट लाइन वर्कर्समधील ९७ लाख ३६ हजार ६२९ जणांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आलाय आणि ४३ लाख १२ हजार ८२६ जणांना दुसरा डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याशिवाय ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये आतापर्यंत ३ कोटी ५३ लाख ७५ हजार ९५३ ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. याच वयोगटातील एकूण १० लाख ७८७ जणांना लसीचा दुसरा डोस देण्याचं काम पूर्ण झालं आहे.

देशात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार देशातील ४५ वर्ष ते ६० वर्षांपर्यंतच्या एकूण २ कोटी १८ लाख ६० हजार ७०९ लोकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ४ लाख ३१ हजार ९३३ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल ३३ लाखांहून अधिक कोरोना लसीकरण पार पडलं आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPrakash Javadekarप्रकाश जावडेकरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस