शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका आणि चीनशी योग्य ताळमेळ साधण्याचे भारतासमोर आव्हान : विजय गोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 14:05 IST

चीनबाबत आपला अभ्यासच कमी असल्याने आपले काही अंदाज चुकत गेले. संकटाला तोंड देण्याच्या चीनच्या क्षमतेला कमी लेखून चालणार नाही.

ठळक मुद्दे '२१ व्या शतकातील भारत - चीन संबंध: आव्हाने आणि संधी’ परिसंवाद संकटाला तोंड देण्याच्या चीनच्या क्षमतेला कमी लेखून नाही चालणार

पुणे :अमेरिकेने स्वत:नेच निर्माण केलेल्या जागतिक व्यवस्थेला धक्के देण्यास सुरूवात केली आहे. ब्रेक्झिटमुळे युरोपियन महासंघाला मोठा फटका बसला आहे. रशियाला नव्या रशियाच्या निर्मितीसाठी भक्कम, शाश्वत आर्थिक पाया साधता आलेला नाही. जपानच्या हातून संधी निघून गेली आहे. चीनचा उदय होत असताना जगाच्या क्षितीजावर अमेरिकेशिवाय कोणीही नाही. हीच भारतासाठी योग्य संधी आहे. सध्याची महासत्ता अमेरिका आणि उगवती महासत्ता चीन या दोघांशीही योग्य ताळमेळ साधण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे,असे मत माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंगळवारी व्यक्त केले.’सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (सीएएसएस) आणि ’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ (एमईएस) यांच्या वतीने  '२१ व्या शतकातील भारत - चीन संबंध: आव्हाने आणि संधी’ या परिसंवादात ते बोलत होते.याप्रसंगी एमईएसचे अध्यक्ष व कॅसचे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), कॅसचे अध्यक्ष मेजर जनरल शिशिर महाजन, माजी राजनैतिक अधिकारी एम. के. मंगलमूर्ती आदी या वेळी उपस्थित होते.गोखले म्हणाले, चीनचा विकासाचा दर हा जगात सर्वाधिक आहे. आपल्या विकासाचा दर वाढला तरी आपण पुढच्या दोन दशकांमध्येही चीनची बरोबरी करणे शक्य होणार नाही. चीनचा विकासदर कदाचित कमी होऊ शकेल. काही आर्थिक संकटे येऊ शकतील. सध्याच्या कोरोनाचाही चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मात्र, संकटाला तोंड देण्याच्या चीनच्या क्षमतेला कमी लेखून चालणार नाही. चीनच्या नेतृत्वाने आता फक्त विकासावर भर देण्याऐवजी राहणीमानाचा दर्जा सुधारण्यावर भर दिला आहे. पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, संशोधन याला ते अधिक महत्त्व देत आहेत. शिक्षणावर भर देऊन तांत्रिक बाबतीत युरोपीय देशांनी घेतलेली आघाडी चीनने मोडून काढण्याचा चंग बांधला आहे. पूर्वीच्या ‘कॉपी कॅट मॉडेल’  या ओळखीतून बाहेर पडत चीन आता नव्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीत आघाडी घेत आहे, असे निरीक्षणही गोखले यांनी नोंदवले.     आपण कच्चा माल, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअरसाठी चीनवर अवलंबून आहोत. त्यामुळे आपण चीनला थेट आव्हान देऊ शकणार नाही. मात्र अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध आणि करोना व्हायरस यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाली आहे. इतरही देश त्यासाठी सज्ज आहेत. त्यांचे धोरण तुलनेने अधिक खुले आहे. त्यामुळे ही संधी साधायची असेल तर भारताला आपल्या धोरणांमध्ये व्यापक बदल करावे लागतील, चीनबाबत आपला अभ्यासच कमी असल्याने आपले काही अंदाज चुकत गेले. आजही आपल्याकडे चीनविषयीच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्त्या नाहीत. त्यामुळे आपल्याकडे चीनविषयीच्या ज्ञानाची प्रचंड कमतरता आहे. ही कमतरता भरून काढणे ही केवळ सरकारची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे. या शिष्यवृत्त्यांमध्ये चीनमध्ये काय चालले आहे, याच्या अभ्यासाबरोबरच जगभरात चीनविषयी काय सुरू आहे, याचा अभ्यास होणेही महत्त्वाचे असल्याचे गोखले यांनी सांगितले.    अन्य सत्रांमध्ये तैवान अ‍ॅल्युम्नाय असोसिएशनच्या अध्यक्षा नम्रता हसीजा, लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी (निवृत्त), कमांडर अर्नब दास (निवृत्त), परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी गौतम बंबावाले, एम. के. मंगलमूर्ती, सुधीर देवरे, प्रियांका पंडित यांनी आपली मते मांडली.

टॅग्स :PuneपुणेVijay Gokhaleविजय गोखलेchinaचीनAmericaअमेरिकाrussiaरशिया