शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अभिनंदन यांची विनाअट सुटका करा, काही बरेवाईट झाल्यास कारवाई करू, भारताचा पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:22 IST

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी करण्याचा भारताने नकार दिला आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी करण्याचा भारताने नकार दिला आहे. अभिनंदन यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी भारताने केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयामधील सुत्रांनी दिली आहे. तसेच अभिनंदन यांना काही झाल्याच भारत कठोर पावले उचलेल असा इशाराही देण्यात आला आहे.बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. दरम्यान, अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताकडून आक्रमक पावले उचलण्यात आली असून, त्यासंदर्भात पाकिस्तानशीही संपर्क साधण्यात आला होता.   विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तान चर्चेस तयास असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी म्हटले होते. मात्र त्याला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने अभिनंदन यांच्या सुटकेसाठी कुठल्याही तडजोडी करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ''पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची तात्काळ सुटका करावी. या प्रकरणात कुठल्याही वाटाघाटी करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. जर पाकिस्तान याबाबत काही तडजोडी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती त्यांची चूक आहे. तसेच विंग कमांडर अभिनंदन यांच्याशी मानवतावादी दृष्टीकोनातून व्यवहार व्हावा, असे भारताने म्हटले आहे. 

यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्याचाही तीव्र शब्दात निषेध केला. ''दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना भारताने लोकवस्ती आणि पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले नाही. मात्र पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भारताने केला. तसेच पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात विश्वसनीय कारवाई करावी, अशी मागणीही भारताने केली आहे. 

भारताने मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यानंतरही पाकिस्तानला पुरावे पाठवले होते. आता पुलवामा हल्ल्याला 13 दिवस उलटल्यानंतरही पाकिस्तान या हल्ल्यामागील जैश ए मोहम्मदची भूमिका नाकारत आहे. 

 

 

टॅग्स :Indiaभारतindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान