शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सिक्कीम-अरुणाचलच्या सीमेवर भारतानं वाढवलं सैन्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 22:18 IST

सतर्कतेचं पाऊल उचलत भारतानंही अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर जवानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

नवी दिल्ली, दि. 11 - डोकलाम वादावरून चीनसोबत गेल्या दोन महिन्यांपासून भारताचा वाद सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सतर्कतेचं पाऊल उचलत भारतानंही अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर जवानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिका-यांनी याची माहिती दिली आहे. अधिकारी म्हणाला, सीमेवर तैनात असलेल्या जवानांना सावधानतेचा इशादा देण्यात आला आहे. डोकलाम मुद्द्यावरून चीननं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. चीन-भारतादरम्यानच्या सिक्कीमपासून अरुणाचल प्रदेश एवढ्या 1400 किलोमीटरच्या लांबच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आले आहेत.  भारताशी तडजोडीची भूमिका स्वीकारण्यात येत असून, चिनी सैन्य मागे घेण्यात येईल या निव्वळ अफवा असल्याचा खुलासा काही तासांपूर्वीच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला होता. चीन आपले सैन्य 100 मीटरपर्यंत मागे घेण्यास राजी झाल्याचे वृत्त अत्यंत चुकीचे असल्याचे चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले होते. चीन 100 मीटर मागे हटण्यास तयार असून भारताने मात्र चिनी सैन्य 250 मीटर मागे न्यावे, अशी मागणी केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. चायना डेलीने दिलेल्या वृत्तानुसार हे वृत्त निराधार असून चीन आपल्या प्रादेशिक हक्कांविषयी कधीही तडजोड करणार नाही अशी प्रतिक्रिया देण्यात आली होती. या संदर्भातली चीनची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि ठाम असल्याचा दावा या प्रवक्त्याने केला होता. भारताने विनाअट आपले या भागात आणलेले सैन्य मागे घ्यावे अशी मागणीही चिनी प्रवक्त्याने चायना डेलीशी बोलताना केली होती.चीन भारताच्या अवास्तव मागण्या कधीही मान्य करणार नाही, अशी दर्पोक्तीही करण्यात आली होती. भारतानेच चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा चिनी परराष्ट्र खात्याने केला आहे. चीनने या संदर्भात भूतानच्या स्वातंत्र्याबद्दल तसेच प्रादेशिक हक्काबाबतही प्रश्न उपस्थित केला होता. मात्र भूतानने चीनचा दावा खोडताना भारताच्या दाव्याशी अनुकूल मत व्यक्त केले होते. चीन रस्त्याचे करत असलेले काम हे भूतानच्या हद्दीत असून ते चीनने भूतानशी केलेल्या कराराच्या विपरीत असल्याची भूमिका भारताने मांडली आहे. तसेच, या रस्त्यामुळे या भागातल्या सुरक्षा व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचेही भारताने म्हटले होते. दोन्ही देशांनी सैन्य मागे घ्यावे आणि चर्चा करावी अशी भारताची भूमिका असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. जूनमध्ये हा पेचप्रसंग निर्माण झाला असून भारत व चीनचे सैन्य सिक्कीम, भूतान व चीन या तिघांचा संगम होत असलेल्या डोकलाम भागात समोरासमोर ठाकले आहे.