शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिर परिसरात स्वच्छता केंद्र उभारण्यास भारत वचनबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 00:58 IST

२.३३ कोटी रुपये खर्च करणार; मूलभूत सोयीसुविधा सुधारणार

काठमांडू : भारत आणि नेपाळचे संबंध ताणलेले असले तरी संपूर्ण जगभरातील भाविकांचे आकर्षण केंद्र असलेल्या काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिर परिसरात २.३३ कोटी रुपये खर्चून स्वच्छता केंद्र उभारण्यास आपण वचनबद्ध आहोत, असे भारताने म्हटले आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे भाविकांना पवित्र स्थळावरील मूलभूत सोयीसुविधा सुधारण्यास मदत मिळणार आहे.नेपाळ-भारत मैत्री : विकास भागीदारी, याअंतर्गत हा प्रकल्प उच्च प्रभाव असणाऱ्या सामुदायिक विकास योजनेत उभारला जाणार आहे. पशुपतीनाथ मंदिर परिसरात स्वच्छता केंद्र उभारण्यासाठी भारतीय दूतावास, नेपाळचे संघीय व्यवहार मंत्रालय व सामान्य प्रशासन व काठमांडू महानगरीय शहर यांच्यातील समझोत्यावर स्वाक्षरी करण्यात आली. हे मंदिर युनेक्सोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही समाविष्ट केलेले आहे.नेपाळच्या भारतीय दूतावासाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने स्वच्छता केंद्रासाठी ३.७२ कोटी नेपाळी रुपयांची (२.३३ कोटी भारताीय रुपये) आर्थिक मदत देण्याचे निश्चित केले आहे. त्यातून काठमांडू महानगरीय शहर नेपाळ सरकारद्वारे निर्धारित नियमांनुसार १५ महिन्यांत हे केंद्र उभारले जाईल. नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराचा भव्य परिसर असून, बागमती नदीच्या दोन्ही काठांवर पसरलेला आहे. येथे नेपाळ व भारतातून तसेच जगभरातून हजारो भाविक दररोज येत असतात.दोन्ही देशांतील तणाव वाढला असला तरी भारत प्रकल्प पुढे नेणारभारताचा मित्र देश असलेल्या नेपाळने भारताचा काही भाग आपल्या नकाशात समाविष्ट केल्यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. नेपाळने हे पाऊल चीनच्या सांगण्यावरून उचलले की काय, अशीही चर्चा सुरू झाली आहे.भारत-नेपाळ सीमेवरील लिपुलेख, कालापानी व लिंपियाधुरा हे भारताचे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे तीन प्रदेश स्वत:च्या हद्दीत दाखविणाºया नेपाळच्या सुधारित नकाशास व या भागांचा नेपाळच्या भूप्रदेशात अंतर्भाव करण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात आली होती.नेपाळी संसदेच्या प्रतिनिधी सभा या कनिष्ठ सभागृहाने या घटनादुरुस्तीला शनिवारी मंजुरी दिली होती. नेपाळच्या या कृतीला भारताने जोरदार आक्षेप घेतला होता.त्यानंतर दोन्ही देशांत तणाव वाढलेला असला तरी भारताने पशुपतीनाथ मंदिरातील स्वच्छता केंद्र निर्माण करण्यास आपण वचनबद्ध आहोत, असे म्हटले आहे.

टॅग्स :Nepalनेपाळ