शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 05:36 IST

भारतीय सैन्याने या भागातून आपली उपकरणे मागे घेण्यास सुरुवात केली होती. 

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील महत्त्वपूर्ण करारानंतर पूर्व लडाखमधील डेमचोक आणि डेपसांग या संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांवरून सैन्य मागे घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यास मदत होणार आहे. लष्कराच्या सूत्रांनी २५ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, २८ ते २९ ऑक्टोबरपर्यंत सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. कराराच्या रूपरेषेवर प्रथम राजनैतिक पातळीवर स्वाक्षरी करण्यात आली आणि त्यानंतर लष्करी पातळीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते. भारतीय सैन्याने या भागातून आपली उपकरणे मागे घेण्यास सुरुवात केली होती. 

या प्रक्रियेबाबत एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांवरून माघारी आता अंतिम टप्प्यात आहे. लष्करातील सूत्रांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांबाबत करार झाला आहे आणि इतर क्षेत्रांसाठी चर्चा अद्याप सुरू आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेली लष्करी माघार पूर्ण झाल्यानंतर या भागात गस्त सुरू होईल. त्यानंतर दोन्ही बाजू आपले सैन्य मागे घेतील आणि तात्पुरते बांधकाम आदी नष्ट करतील. या भागात गस्त घालण्याची परिस्थिती एप्रिल २०२० पूर्वीच्या पातळीवर आणली जाण्याची अपेक्षा आहे.

लष्कराने सज्ज रहावे : जयशंकरवेगाने उदयास येत असलेले भू-राजकीय धोके आणि संधींशी जुळवून घेण्यास तयार राहण्याचे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी लष्करी नेतृत्वाला केले. सैन्य कमांडर संमेलन-२०२४ च्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाच्या दिवशी ते बोलत होते. “जागतिक आणि भू-राजकीय गुंतागुंत : भारतासाठी संधी आणि सशस्त्र दलांकडून अपेक्षा” हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनS. Jaishankarएस. जयशंकर