शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

India China FaceOff: भारताचं टेन्शन वाढलं; चीनने LAC वर १०० हून अधिक रॉकेट लॉन्चर केले तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 15:33 IST

चीनने एलएसीवर पीएचएल ०३, लॉन्ग रेंज मल्टीपल रॉकेट लॉन्चर सिस्टम तैनात केली आहे. नवीन PHL 03 मल्टीपल रॉकेट लॉन्चरचा १० यूनिट्स लडाखला पाठवण्यात आले आहेत.

बीजिंग – एकीकडे चीनसोबत सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी भारत(India) चर्चेवर जोर देत आहे तर दुसरीकडे चीन (China) वारंवार भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक नियंत्रण रेषा(LAC) वर चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनने सीमेवर १०० हून अधिक अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर तैनात केलेत. इतकेच नाही तर चिनी सैन्याने जवळपास १५५ एमएम कॅलिबरच्या PCL 181 सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्जर तैनात केले आहे. त्यामुळे चीनचा हेतू ठीक नाही हे दिसून येत आहे.

साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की, चीनने भारतासोबत असलेल्या अतिसंवेदनशील सीमेवर १०० हून अधिक अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर तैनात केलेत. पीपुल्स लिबरेशन आर्मी(PLA) हिमालयातील रक्त गोठावणाऱ्या थंडीसाठी तयारी करत आहेत. हे उत्तर M777 अल्ट्रा लाइट हॉवित्जरसह भारतीय सैन्याच्या ३ रेजिमेंटच्या तैनातीनंतर प्रत्युत्तर म्हणून केल्याचं चीनचं म्हणणं आहे.

१० यूनिट्स लडाखला पाठवले

चीनने एलएसीवर पीएचएल ०३, लॉन्ग रेंज मल्टीपल रॉकेट लॉन्चर सिस्टम तैनात केली आहे. नवीन PHL 03 मल्टीपल रॉकेट लॉन्चरचा १० यूनिट्स लडाखला पाठवण्यात आले आहेत. प्रत्येक यूनिटमध्ये ४ क्रू मेंबरचा सहभाग आहे. त्यात ३०० MM च्या १२ लॉन्चर ट्यूब आहेत. हे रॉकेट ६५० किमी अंतरापर्यंत हल्ला करण्याची क्षमता ठेवते. यातील १२ मीटर लांब रॉकेट ६० किमी प्रतितास वेगाने उड्डाण भरू शकते.

रॉकेट सिस्टम रेंज ३५० KM

चीनने भारतीय सीमेवर पीसीएल १९१ रॉकेट लॉन्चरही तैनात केले आहेत. याला चीनने एआर ३ सिस्टमच्या आधारे विकसित केले आहे. या रॉकेट सिस्टमची रेंज ३५० किमी इतकी आहे. ही मॉड्युलर रॉकेट सिस्टम आठ ३७० मिमीच्या रॉकेटला फायर करू शकते. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, चिनी सैन्याचे १०० हून अधिक पीसीएल १८१ ट्रक माऊंटेड हॉवित्जर तैनात केले आहे. त्याशिवाय १५५ एमएम कॅलिबर पीसीएल १८१ सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्जर लडाखच्या आसपास सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव