शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: आपल्या हद्दीत राहा! भारताने चीनला खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 19:28 IST

देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच चीनने आपल्या हालचाली आपल्या हद्दीतच मर्यादित ठेवाव्यात

ठळक मुद्देद्विपक्षीय मतभेदांबाबत शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा, असे भारताचे मत मात्र परिस्थितीनुसार प्रत्येक प्रकारची कारवाई करण्यास भारत तयार आम्ही भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व अबाधित राखण्यासाठी कटीबद्ध आहोत

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान क्षेत्रात झालेल्या झटापटीनंतर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. या तणावाच्या वातावरणादरम्यान, देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच चीनने आपल्या हालचाली आपल्या हद्दीतच मर्यादित ठेवाव्यात, असे भारताने चीनला सुनावले आहे.

भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, द्विपक्षीय मतभेदांबाबत शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा, असे भारताचे मत आहे. मात्र परिस्थितीनुसार प्रत्येक प्रकारची कारवाई करण्यास भारत तयार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने आज वंदे भारत मिशनबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र यावेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांवर प्रसारमाध्यमांकडून सध्या भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादाबाबत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. तेव्हा अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, सीमाभागांमध्ये शांतता आणि सौहार्दाचे वातावरण कायम राहण्याचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. तसेच सर्व मतभेदांचे चर्चेच्या माध्यमातून निराकरण व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र काल पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व अबाधित राखण्यासाठी कटीबद्ध आहोत.’’

सीमारेषेवर चीनने आपल्या हालचाली, त्यांच्या सीमेच्या मर्यादेत राहून करेल, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संवाद अद्याप थांबलेला नाही. विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. त्याअंतर्गत दोन्ही देशांमध्ये आज मेजर जनरल स्तरावरील बैठक झाली. ही बैठक सुमारे सहा तास चालली. मात्र त्यातून काही तोडगा निघाला नाही.  

टॅग्स :IndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय