शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

India China FaceOff: चिनी खाद्यपदार्थांवर बंदीचे आवाहन प्रक्षोभक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 02:16 IST

India China FaceOff: रामदास आठवले यांनी केलेले आवाहन प्रक्षोभक आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

नवी दिल्ली : देशातील हॉटेलांमधून चिनी खाद्यपदार्थांची विक्री करण्यास बंदी घालावी, लोकांनी या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालावा, असे केंद्रीय समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेले आवाहन प्रक्षोभक आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केली आहे. लडाखमधील गलवान खोºयात चिनी लष्कराशी झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले होते.व्हेज, नॉनव्हेज मंचुरियन राईस, गोबी मंचुरियन असे अनेक चिनी पदार्थ खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत असतात. आठवले यांच्या वक्तव्याबद्दल काही नेटकऱ्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, देशातील हॉटेलामध्ये मिळणारे चिनी खाद्यपदार्थ खरेतर भारतीय पद्धतीने बनविले जातात. या खाद्यपदार्थांवर बंदी घातल्यास, ते बनविण्यासाठी राबणारे हजारो हात बेकार होतील. देशाच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या साथीमुळे मोठा फटकाबसला आहे. त्यातच असे निर्णय घेतले तर बेरोजगारांचेही प्रमाण वाढेल. पत्रकार मोहम्मद झुबैर यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, चिनी खाद्यपदार्थांची बहुतांश हॉटेल ईशान्य भारतातील लोकांकडून चालविली जातात किंवा हॉटेलात हे खाद्यपदार्थ बनविणाºयांंमध्ये त्या लोकांचे प्रमाण मोठे आहे. चिनी खाद्यपदार्थांवर बंदी घाला हे केंद्रीय समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांचे विधान अतिशय धोकादायक आहे. अशा विधानांमुळे चिनी खाद्यपदार्थ विकणारे किंवा ते बनविणाºयांवर हल्लेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.>कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर रामदास आठवले यांनी केलेली ‘गो कोरोना गो’ ही घोषणा देशभरात चर्चेचा विषय बनली होती. त्यानंतर आता आठवले यांनी चिनी खाद्यपदार्थांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. लेखक सिद्धार्थ सिंह यांनी म्हटले आहे की, देशातील अनेकांच्या हातांना सध्या काम नाही. त्यामुळे अशा बेकारांचे तांडे चिनी खाद्यपदार्थ विकणाºया हॉटेलांवर किंवा रस्त्यावर त्या खाद्यपदार्थांची गाडी चालविण्यावर हल्लेही करू शकतात.>धोकादायक विधाने चुकीचीचिनी खाद्यपदार्थांवर बंदी घाला हे केंद्रीय समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांचे विधान अतिशय धोकादायक आहे. अशा विधानांमुळे चिनी खाद्यपदार्थ विकणारे किंवा ते बनविणाºयांवर हल्लेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले