शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

India China FaceOff: शानदार! जबरदस्त!! २० दिवस भारतीय जवानांनी गाजवले; चीनला दणका

By कुणाल गवाणकर | Updated: September 20, 2020 18:37 IST

चीनला जोरदार धक्का; प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीयांचा पराक्रम

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये चीनकडून सातत्यानं आगळीक सुरू असताना आता भारतीय जवानांनी मोठं यश मिळवलं आहे. सीमावर्ती भागातील तणाव वाढला असताना भारतीय सैन्यानं जबरदस्त पराक्रम केला आहे. गेल्या २० दिवसांत भारतीय जवानांनी चिनी सीमेजवळील सहा नव्या टेकड्यांवर कब्जा केला आहे. भारतीय सैन्यावर वरचष्मा मिळवण्यासाठी चिनी सैन्य या टेकड्या काबीज करण्याच्या प्रयत्नात होतं. मात्र भारतीय जवानांनी चीनचे मनसुबे उधळून लावले.भारतीय जवानांनी सहा नव्या टेकड्यांवर कब्जा केला आहे. मागर हिल, गुरुंग हिल, रेजांग ला राचाना ला, मोखपारी आणि फिंगर ४ रिज लाईनवरील सर्वात उंच टेकड्यांवर भारतीय सैन्यानं ताबा मिळवल्याची माहिती उच्च स्तरीय सुत्रांनी दिली. भारतीय जवानांनी वर्चस्व मिळवलेल्या टेकड्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत पसरलेल्या आहेत. या भागाचं सामरिक महत्त्व पाहता टेकड्यांवरील वर्चस्वाचा भारतीय जवानांना मोठा फायदा मिळेल.उद्धव ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार; मराठापाठोपाठ धनगरही राज्यभर आंदोलन करणारप्रत्यक्ष नियंत्रण रेषेसोबतच उंच टेकड्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी भारत आणि चीनच्या सैन्यात २९ ऑगस्टपासून संघर्ष सुरू झाला. चीननं पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील थाकुंग परिसरातील दक्षिणेकडील टेकड्यांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. उच्चपदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पँगाँगच्या उत्तर किनाऱ्यापासून दक्षिण तटापर्यंत कमीत कमी तीन वेळा हवेत गोळीबार करावा लागला.विमान कंपनीनं भन्नाट शक्कल लढवली; हजारो-लाखोंची तिकिटं हातोहात खपलीब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉप टेकड्या चीनकडील भागांमध्ये येतात. तर भारतीय जवानांनी वर्चस्व मिळवलेल्या टेकड्या भारतीय हद्दीत येतात. भारतीय सैन्यानं सहा टेकड्या ताब्यात घेतल्यानं चीनला धक्का बसला. या भागात आता चीननं जवळपास ३ हजारांची अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. रेजांग ला, राचाना ला भागात चीननं सैनिकांची संख्या वाढवली आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख