शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: आमच्या हद्दीत गस्त घालणा-या जवानांच्या कर्तव्यात अडथळा आणला, भारताचा चीनवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:17 IST

India China FaceOff: उलट भारतीय हद्दीत गस्त घालणा-या भारतीय जवानांच्या कर्तव्यात तुम्हीच अडथळा आणला, या वस्तुस्थितीचा उल्लेख करून चीनच्या कागाळ््या अमान्य केल्या.

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : गलवान खोेरे आमचे असल्याचा चीनचा कांगावा धुडकावून भारताने ड्रॅगनचे पितळ उघडे पाडले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अत्यंत कठोर शब्दात भूमिका स्पष्ट केली. चीनचा दावा अतिशयोक्तीपूर्ण व अस्वीकार्ह असल्याचे सुनावत (चीनच्या) आधीच्या ऐतिहासिक भूमिकेशीदेखील हा दावा विसंगत असल्याचे सांगून भारताने अप्रत्यक्षपणे ड्रॅगनचा जमिनीचा हव्यास जगासमोर आणला. उलट भारतीय हद्दीत गस्त घालणा-या भारतीय जवानांच्या कर्तव्यात तुम्हीच अडथळा आणला, या वस्तुस्थितीचा उल्लेख करून चीनच्या कागाळ््या अमान्य केल्या.लाईन आॅफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोलमध्ये आपल्या हद्दीत गस्त घालणाºया भारतीय जवानांना बाधा आणण्याचा प्रयत्न चीनकडूनच मे मध्येच सुरू झाला. जवानांकडून त्यास लष्करी शिष्टाचारासह विरोध झाला. त्यामुळे भारताने पूर्वस्थिती बदलली नाहीच. इतर सीमेप्रमाणेच इथेही जवानांनी एलएसी सांभाळली, अशी ठाम भूमिका भारताने पाचव्याही दिवशी कायम ठेवली. १५ जूनला गलवान खो-यातील झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. चीनने आपल्या जखमी वा मृत सैनिकांची माहिती दडवून ठेवली आहे. दरम्यान, दगाफटका होण्याची शक्यता असल्याने भारताने लद्दाख सीमेवर गस्त वाढवली आहे. दोन्ही देशांमध्ये लष्कर स्तरावर चर्चा पुढच्याही आठवड्यात सुरु राहील. गलवान खोºयात हातपाय पसरण्याच्या तयारीत असलेल्या चीनला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराच्या अभियंतांनी अवघ्या ७२ तासांमध्ये युद्धपातळीवर काम करून गलवान नदीवर स्व-हद्दीत पूल बांधला. त्यामुळेच ड्रॅगन अस्वस्थ झाला.स्व हद्दीत बांधकामगलवान नदीचा प्रवाह विस्कळीत करण्यासाठी स्वत:च्या हद्दीत रस्ते बांधायची तयारी चीनने सुरू केली आहे. अर्थ इमॅजिंग कंपनी प्लॅनेट लॅब्जच्या हवाल्याने काही छायाचित्रे पाश्चिमात्य वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली. भारतदेखील आपल्या हद्दीतील बांधकामे सुरूच ठेवणार आहे.माध्यमांची गळचेपीचिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिजियान झाओ यांनी प्रश्न विचारणाºया भारतीय पत्रकार, अभ्यासकांना अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटवरून ब्लॉक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वपक्षीय बैठकीतील निवेदन बीजिंगमधील भारतीय दूतावासाने चिनी वुई चॅटवर अपलोड केले. मात्र ‘राष्ट्रीय सुरक्षेला बाधा’ या कारणावरून ते चिनी सरकारने काढून टाकले.>सॉफ्ट डिप्लोमसी आक्रमक; नेपाळची सावध भूमिकाआॅल इंडिया रेडिओनेदेखील तिबेटीअन वर्ल्ड सर्व्हिसवरून 'खºया' बातम्या ऐकण्याचे आवाहन श्रोत्यांना केले. सॉफ्ट डिप्लोमसीत भारतानेदेखील आता आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताचे मित्रराष्ट्र नेपाळने कुणाचीही बाजू न घेता सावध भूमिका घेत दोन्ही शेजारी देश शांततेच्या मागार्ने हा प्रश्न सोडवतील, अशी प्रतिक्रिया दिली. नेपाळच्या निवेदनात भारतानंतर चीनचे नाव आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले. तिथे सत्ताधारी राजकीय पक्षात दोन गट पडले असून ‘रोटी-बेटी’ व्यवहार असलेल्या भारताविरोधात भूमिका घेण्यास अनेकांनी नकार दिला. अंतर्गत दबाव वाढल्याने नेपाळने चीनची तळी न उचलण्याचा सूज्ञपणा दाखवला. आता बांगलादेशाच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, रशिया, आॅस्ट्रेलिया हे देश भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत.>राजकारण सुरूचपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वपक्षीय बैठकीतील निवेदनावर राजकारण सुरू झाले आहे. भारताच्या इंचभर हद्दीतही कुणी नाही, या मोदींच्या विधानावर काँग्रेस नेते व माजी संरक्षण मंत्री पी. चिंदबरम, माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी स्पष्टीकरण मागितले. चीनने आपला भूभाग बळकावल्याचा संभ्रम त्यामुळे निर्माण झाला. पंतप्रधान कार्यालयाने त्यावर स्पष्टीकरण दिले. प्रत्यक्ष ताबा रेषेच्या बदलास भारताची परवानगी नाही.देशाचे सार्वभौमत्व व अखंडता अबाधित आहे. भारतीय हद्दीत कुणीही शिरलेले नाही शिवाय आपल्या लष्करी चौक्यांवरही कुणाचा ताबा नसल्याचे पंतप्रधान बैठकीत म्हणाले होते. परंतु त्यावरच प्रश्नचिन्ह लावून वाद निर्माण होणे दुदैर्वी आहे. भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्यांना ठोस प्रत्यूत्तर देवू, असे पीएमओने म्हटले आहे.गलवान खोºयात एलएसीनजीक चीनने केलेला बांधकामाचा प्रयत्न भारतीय जवानांनी रोखला, असेही यात नमूद आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत