शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: भारताचा चीनला आणखी एक धक्का; 'त्या' औषधावर आता अँटी-डंपिंग ड्युटी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 11:06 IST

India China FaceOff: चीनमधून होणारी निर्यात रोखण्यासाठी मोदी सरकारचा निर्णय; अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून चीनची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २९-३० ऑगस्टला चिनी सैन्यानं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो भारतीय जवानांनी हाणून पाडला. यानंतर आता दोन्ही देशांमधला तणाव आणखी वाढला आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या सिप्रोफ्लोक्सासिन या अँटी-बॅक्टेरियल औषधावर अँटी-डंपिंग ड्युटी लावण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.चीनला तगडा झटका! PUBG, TikTok बॅनमुळे तब्बल 1.46 लाख कोटी बुडालेकेंद्रीय अर्थ मंत्रालयानं २ सप्टेंबरला एक अधिसूचना प्रसिद्ध केली. चीनमधून उत्पादित होणाऱ्या, चीनमधून निर्यात होणाऱ्या औषधांवर अँटी-डंपिंग ड्युटी लावली जाईल. अन्य देशांत उत्पादन झालेल्या, मात्र चीनमधून निर्यात केल्या जाणाऱ्या औषधांवरही अँटी-डंपिंग ड्युटी आकारली जाईल, अशी माहिती अधिसूचनेत आहे. यामुळे शांगयू जिंगक्सिन फार्मास्युटिकल कंपनी लिमिटेड, झेजियंग लांगहुआ फार्मास्युटिकल कंपनी लिमिटेड आणि झेजियंग ग्युबांग फार्मास्युटिकल कंपनी लिमिटेड याशिवाय अन्य चिनी कंपन्यांना अँटी डंपिंग ड्युटी भरावी लागेल.कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार, लष्कर प्रमुख नरवणेंचा चीनला इशारादेशांतर्गत औषधांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या तक्रारीनंतर याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. त्याआधी या प्रकरणी आवश्यक पडताळणी करण्यात आली. २०१५-१६ मध्ये चीनमधून ११७ टन सामान भारतात आलं. एप्रिल २०१८ ते जून २०१९ या कालावधीत आयातीचा हाच आकडा ३७७ टनांवर गेला. चीनमधून येणाऱ्या सामनामुळे देशातल्या कंपन्यांचं नुकसान होत असल्यानं अँटी डंपिंग ड्युटी लावण्याची शिफारस करण्यात आली होती.रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव