शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराने चिनी सैनिकाला पकडले

By बाळकृष्ण परब | Updated: January 9, 2021 15:27 IST

India-China Update : भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील सीमेवर सुरू असलेला तणाव अजूनही कायम आहे. दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून एक मोठी बातमी आली आहे.

ठळक मुद्देभारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराने पकडलेचुशूल विभागातील गुरूंग खोऱ्याजवळील सीमेवरून घेतले ताब्यातसध्या भारतीय लष्कराकडून या चिनी जवानाची चौकशी सुरू आहे

लडाख - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील सीमेवर सुरू असलेला तणाव अजूनही कायम आहे. कडाक्याच्या थंडीतही दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर उभे आहे. दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून एक मोठी बातमी आली आहे. चुशूल विभागातील गुरूंग खोऱ्याजवळील सीमेवरून भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराने पकडले आहे. दरम्यान, आपण रस्ता भटकून भारताच्या हद्दीत आल्याचा दावा या चिनी सैनिकाने केला आहे.सध्या भारतीय लष्कराकडून या चिनी जवानाची चौकशी सुरू आहे. अधिक चौकशीमधून समाधानकारक माहिती मिळाल्यानंतरच या चिनी सैनिकाला चीनच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार ८ जानेवारी रोजी लडाखमधील एलएसीजवळ भारतीय सीमेच्या आत चीनचा एक सैनिक पकडला गेला. या चिनी सैनिकाला पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याच्या भागात पकडण्यात आले. या सैनिकाने दिलेल्या जाबाबावर विश्वास ठेवल्यास त्याने आपण रस्ता चुकून भारताच्या हद्दीत आल्याचे म्हटले आहे. मात्र त्याने भारताच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर भारताच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले.२०२०च्या पूर्वार्धापासून एलएसीच्या दोन्ही बाजूला भारत आणि चीनचे सैन्य तैनात आहे. सध्या दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र त्यावर समाधानकारक तोडगा अद्याप निघालेला नाही. कडाक्याच्या थंडीमुळे चिनी सैन्याच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वातावरण मात्र तापलेलेच आहे. आता या चिनी सैनिकाने कोणत्या परिस्थितीत सीमा पार केली याचा शोध सध्या सुरू आहे.मिळत असलेल्या माहितीनुसार जर भारतीय लष्कराकडून करण्यात येणाऱ्या तपासात चिनी सैनिकांने केलेला दावा खरा असल्याचे सिद्ध झाले तरच त्याला सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर चिनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवान