शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

India-China Clash: अधिवेशनात उमटले तवांग चकमकीचे पडसाद; सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा वॉकआउट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 5:20 PM

India-China Clash: काँग्रेस, टीएमसीसह अनेक पक्षांचे खासदार लोकसभेत भारत-चीन मुद्द्यावर चर्चेची मागणी करत होते.

Lok Sabha Session: अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांग येथे भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावरून बुधवारी (14 डिसेंबर) लोकसभेत गदारोळ झाला. काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार आणि तृणमूल काँग्रेस (TMC) खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चेची मागणी विरोधक करत होते. बुधवारी प्रश्नोत्तराचा तास संपताच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी केली.

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1962 मध्ये लोकसभेत भारत-चीन युद्धावर चर्चा करण्यास परवानगी दिली होती. आम्ही भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी करत आहोत. 1962 मध्ये जेव्हा भारत-चीन युद्ध सुरू झाले तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी 165 खासदारांना या सभागृहात बोलण्याची संधी दिली. यानंतर आपण काय करायचे ते ठरले.

सभापती काय म्हणाले...काँग्रेस नेत्याच्या मागणीला उत्तर देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि टीएमसीने निषेधार्थ वॉकआऊट केला आणि भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चा होऊ न दिल्याचा आरोप सरकारवर केला. 

याआधीही खासदारांनी सभात्याग केला होताआदल्या दिवशी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विविध मुद्यांच्या निषेधार्थ लोकसभेतून सभात्याग केला होता. सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांना काही मुद्दे उपस्थित करायचे होते. यानंतर काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्ससह अन्य पक्षांच्या सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहातून सभात्याग केला. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाindia china faceoffभारत-चीन तणावArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश