शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

LAC ओलांडून भटकत सीमेच्या आत आले 13 याक, भारतीय सैन्यांनी चीनच्या केले स्वाधीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 14:14 IST

भारतीय जवांनानी पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं. त्या याकना भारतीय जवानांनी चीनच्या हवाली केले.

सोमवारी भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडने एक अत्यंत कौतुकास्पद गोष्टीची माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) दुसर्‍या बाजूला म्हणजेच चिनी बाजूने भटकत असलेली काही याक आणि त्यांच्या बछड्यांनी भारतीय सीमेच्या हद्दीत प्रवेश केला, त्यानंतर भारतीय जवांनानी पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं. त्या याकना भारतीय जवानांनी चीनच्या हवाली केले. ईस्टर्न कमांडने सांगितले की, चिनी अधिका-यांनी 'संवेदनशील वृत्ती' दाखविल्याबद्दल भारतीय सैन्याचे आभार मानले.ईस्टर्न कमांडच्या एका ट्विटमध्ये असे सांगितले गेले होते की, 'मानवतावादाच्या जोरावर भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामंगच्या LACच्या पलीकडे सीमेवरून आलेल्या 13 याक आणि चार वासरे 7 सप्टेंबर रोजी चीनच्या ताब्यात दिली. यावेळी उपस्थित चिनी अधिका-यांनी भारतीय सैन्याच्या दयाळूपणाबद्दल आभार मानले.भारत आणि चीन यांच्यामध्ये लडाखच्या सीमेवर LACवरून तणाव आहे. सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे शुक्रवारी लडाख येथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले. ते म्हणाले की, दोन्ही देश लष्करी व मुत्सद्दी चर्चेद्वारे हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.अलीकडे भारताने पँगॉग तलावाच्या दक्षिणेकडील किना-यावर आक्रमक चिनी सैन्याच्या कारवाया रोखल्या.  चिनी सैन्याने चुशूलजवळील पँगॉग त्सो येथील पॅंगॉग तलावाच्या दक्षिण किना-याजवळील भारतीय भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सैन्याने वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला.चीनमधील घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे एप्रिल-मेपासून भारत आणि चीनला LACवर तणाव येत आहे. फिंगर एरिया, गलवान व्हॅली, हॉट स्प्रिंग्ज आणि कोंगरुआंग नाला भागात चीनशी तणाव आहे. परिस्थिती अधिक गंभीर बनली जेव्हा जून महिन्यात, गलवान खो-यात दोन देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित चकमक झाली आणि 20 भारतीय जवानांना यात वीरमरण आले. 40हून अधिक चिनी सैनिकही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे, परंतु याबाबत कोणतीही खात्री पटलेली नाही.