शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'एक हजार महात्मा गांधी आणि एक लाख नरेंद्र मोदी मिळूनही भारत स्वच्छ करु शकत नाहीत'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 15:19 IST

स्वच्छता मोहिमेला तीन वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाने सहभाग घेतल्याशिवाय स्वच्छता मोहिम कधीच पुर्ण होऊ शकत नाही असं म्हटलं आहे

नवी दिल्ली - स्वच्छता मोहिमेला तीन वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाने सहभाग घेतल्याशिवाय स्वच्छता मोहिम कधीच पुर्ण होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, 'एक हजार महात्मा गांधी आणि एक लाख नरेंद्र मोदी जरी आले तरी हे स्वप्न पुर्ण होऊ शकत नाही'. 'स्वच्छता मोहीम फक्त सरकार किंवा महात्मा गांधींचं आंदोलन राहिलेलं नाही, देशातील सामान्य नागरिकांनी हे आंदोलन आपल्या खांद्यावर घेतलं आहे', असं नरेंद्र मोदी बोलले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशवासियांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करत सांगितलं की, 'जर एक हजार महात्मा गांधी आले, एक लाख नरेंद्र मोदी आले, सर्व मुख्यमंत्री एकत्र आले, सर्व सरकारांनी एकत्र प्रयत्न केला तरी स्वच्छतेचं स्वप्न पुर्ण होऊ शकत नाही. पण जर 125 कोटी देशवासी एकत्र आले, तर पाहता पाहता हे स्वप्न पुर्ण होऊन जाईल'. आपण हे बोलल्यानंतर आपली धुलाई होऊ शकते असं मिश्किलपणे सांगत देशवासियांसमोर तथ्य ठेवणं गरजेचं आहे असं नरेंद्र मोदी बोलले. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवरही टीका केली. 'मोदीला शिव्या देण्यासाठी खूप विषय आहेत. मात्र समाजाला जागरुक करण्यासाठी होणा-या कार्यक्रमांमध्ये राजकारण आणता कामा नये. समाजात परिवर्तन घडवणा-या विषयांची खिल्ली उडवली जाऊ नये', असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

महात्मा गांधींचा मार्ग चुकीचा असू शकत नाही टीका होत असतानाही सरकार स्वच्छता मोहिमेला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. ते बोललेत की, 'तीन वर्ष आम्ही हे काम करत आहोत, कारण बापूंनी जो रस्ता सांगितला तो चुकीचा असू शकत नाही. आव्हानं आहेत, पण आव्हानं आहेत म्हणून देशाला ज्या परिस्थितीत आहे तसंच ठेवलं जाऊ शकत नाही. ज्या गोष्टी केल्यानंतर आपली स्तुती होईल, उदोउदो होईल अशाच गोष्टींना आपण हात लावायचा का ?'.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधी