शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 22:45 IST

सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतरही मालदीवमधील राजकीय अस्थिरता संपलेली नाही. पराभूत झाल्यानंतरही राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी अद्याप येथील सत्ता सोडली नसल्याने राजकीय पेच वाढला आहे.

नवी दिल्ली - सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतरही मालदीवमधील राजकीय अस्थिरता संपलेली नाही. पराभूत झाल्यानंतरही राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी अद्याप येथील सत्ता सोडली नसल्याने राजकीय पेच वाढला असून, यामीन यांनी सत्ता न सोडल्यास लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारताकडून हस्तक्षेप होण्याचीही शक्यता आहे. तसेच   निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही यामिन यांनी सत्ता न सोडल्यास त्यांना कठोर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिका आणि युरोपियन देशांनी दिला आहे.  मालदीवमधील परिस्थितीवर भारताची नजर असून, गरज पडल्यास योग्य पावले उचलण्यात येतील, असे भारताने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक निर्बंधांसोबतच अन्य पर्यायांसदर्भात आंतरराष्ट्रीय समुदाय विचार करत आहे. यामध्ये भारताचाही सक्रीय सहभाग असणार आहे. मालदीवमध्ये झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार इब्राहीम मोहम्मद सोहील यांनी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना पराभूत केले होते. मात्रा यामीन यांना अद्याप सत्ता सोडलेली नाही. तसेच त्यांनी निवडणुकीतील निकालालाही न्यायालयात आव्हान दिले आहे. 

दरम्यान, मालदीवमधील राष्ट्रपती निवडणुकीतील निकाल हा चीनसाठी धक्कादायक होता. सत्ताधारी असलेल्या अब्दुल्ला यामीन यांचा पराभव होऊ शकत नाही, अशीच अटकळ बांधली जात होती. परंतु विरोधी पक्षाचे उमेदवार इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला. मालदीवमध्ये अब्दुल्ला यामीन यांच्या पराभवानं एक प्रकारे चीनलाही धक्का बसला आहे. विशेष म्हणजे यातून भारताला नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. यामीन हे चीनच्या फारच जवळ होते आणि ते गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत फटकून वागत होते. परंतु आता सोलिह यांच्या विजयानं भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारत