शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

अपूर्ण कुंपण, घुसखोरीचा धोका; भारत-बांग्लादेश सीमेवर मोदी सरकारसमोर कोणती आव्हाने..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:10 IST

बांग्लादेशात सत्तांतर झाल्यापासून सीमा भागात तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

India Bangladesh Border Safety: बांग्लादेशात सत्तांतर झाल्यापासून भारत आणि बांग्लादेशातील संबंध बिघडले आहेत. सीमा भागातही तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने मंगळवारी (11 फेब्रुवारी 2025) लोकसभेत सीमेवरील परिस्थितीबाबत महत्वाची माहिती दिली. केंद्राने सांगितले की, भारत आणि बांग्लादेशमधील एकूण 4096 किमी सीमेपैकी 864.5 किमी सीमेवर अद्याप कुंपण बसवण्यात आले नाही. तृणमूल काँग्रेसचे खासदार दीपक अधिकारी यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली.

पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या खासदाराने गृह मंत्रालयाला बांग्लादेशच्या सीमेला लागून असलेल्या एकूण जमिनीचा तपशील, बांग्लादेशशी सीमा असलेल्या राज्यांचा तपशील, बांग्लादेशच्या सीमेच्या एकूण लांबीचा तपशील आणि सीमेवर कुंपण न लावण्याची कारणे विचारली होती.

या प्रश्नांच्या उत्तरात केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी सभागृहात सांगितले की, भारत-बांग्लादेश सीमेची एकूण लांबी 4,096.7 किलोमीटर आहे. बांग्लादेशशी सीमा सामायिक केलेली राज्ये पश्चिम बंगाल (2,216.7 किमी), आसाम (263 किमी), मेघालय (443 किमी), त्रिपुरा (856 किमी) आणि मिझोराम (318 किमी) आहेत.

कुंपणाचे काम का होऊ शकले नाही?864.5 किमी भारत-बांग्लादेश सीमेवर कुंपण घालणे बाकी आहे, ज्यामध्ये 174.5 किमी दरीचा भाग आहे. याशिवाय, इतर भागात दलदलीची जमीन आणि भूस्खलनाची प्रवण क्षेत्रे यांसारख्या कठीण आव्हानांमुळे कुंपण पूर्ण होऊ शकले नाही. तसेच, बॉर्डर गार्ड बांग्लादेश (बीजीबी) चा आक्षेप आणि भूसंपादनास होणारा विलंब, यामुळेही कुंपणाचे काम पूर्ण होऊ शकले नाही, अशी माहिती त्यांनी दिली. 

 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतIndian Armyभारतीय जवान