शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

"त्या दिवशी चीनसोबत युद्धाला तोंड फुटले असते, पण…" लष्कराच्या बड्या अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

By बाळकृष्ण परब | Published: February 18, 2021 11:45 AM

india china faceoff : भारत आणि चीनमधील तणाव निवळत असतानाच भारतीय लष्कराचे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ठळक मुद्देलडाखमधील तणावादरम्यान एकवेळ अशी आली होती जेव्हा दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होतेभारताने कैलाश पर्वतश्रेणीतील पर्वतांवर २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री कब्जा केला होताभारताने अचानक केलेल्या कारवाईमुळे भारताला धक्का बसला होता. त्यानंतर चिनी सैन्याने या पर्वतांवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले होते

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये पूर्व लडाखमध्ये (india china faceoff) गेल्या एक वर्षापासून सुरू असलेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. डिसएंगेजमेंटवर झालेल्या सहमतीनंतर दोन्ही देशांचे सैन्या पँगाँग त्सो परिसरातून हटवण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही देशांमधील तणाव निवळत असतानाच भारतीय लष्कराचे  (Indian Army) नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (India avoided war with China, Says Northern Army Commander Y. K. Joshi)

डिसएंगेजमेंटच्या प्रक्रियेवर प्रतिक्रिया देताना लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारताने चीनसोबतचे युद्ध टाळले आहे. या तणावादरम्यान एकवेळ अशी आली होती जेव्हा दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेल्या तणावादरम्यान अनेक चढ-उतार आले. पण ३१ ऑगस्ट रोजी दोन्ही देश युद्धाच्या परिस्थितीत पोहोचले होते. भारताने कैलाश पर्वतश्रेणीतील पर्वतांवर २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री कब्जा केला होता. त्यामुळे भारताला युद्धक्षेत्रात रणनीतिक आघाडी मिळाली होती. भारताने अचानक केलेल्या कारवाईमुळे भारताला धक्का बसला होता. त्यानंतर चिनी सैन्याने या पर्वतांवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र अखेरीस युद्धाची वेळ आली नाही. 

दरम्यान, लडाखमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या Opration Snow leopard बाबत माहिती देताना वाय. के. जोशी यांनी सांगितले की, या कारवाईत भारतीय लष्कराने आपला कुठलाही भूभाग गमावला नाही. पँगाँग त्सोमधून चिनी सैन्याची माघार हा भारताचा विजय आहे.  

पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावर भारतीय लष्कराच्या धडाकेबाज कारवाईमुळे चिनी सैन्य हैराण झाले होते. भारताने अनेक ठिकाणी चीनपेक्षा अधिक रणनीतिक आघाडी घेतली होती. त्यामुळे भारत आपल्या मागण्यांपासून माघार घेणार नाही, त्यामुळे पूर्वस्थितीत जावे लागेल, याची जाणीव चीनला झाली.    

या संपूर्ण तणावाच्या काळात भारतीय लष्कराने या परिसरातील काही महत्त्वपूर्ण शिखरांवर केलेला कब्जा हा टर्निंग पॉईंट ठरला. लेफ्टनंट जनरल जोशी यांनी सांगितले की, या आक्रमक कारवाईमुळे बळाचा वापर करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलता येणार नाही आणि भारत आपल्या भूभागाचे समर्थपणे रक्षण करेल हे चिनी सैन्याला कळून चुकले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानIndiaभारत