शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दगाबाज पाकिस्तानवर नाही विश्वास! भारताने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीच्या सुरक्षेची मागितली हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 17:15 IST

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना भेटण्याची त्यांच्या पत्नीला परवानगी दिली आहे. पण भारत या भेटीआधी बरीच सतर्कता आणि काळजी घेत आहे.

ठळक मुद्देभारताने पाकिस्तानकडे कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईच्या सुरक्षेची हमी मागितली आहे. पाकिस्तानात आल्यानंतर दोघींची कुठलीही चौकशी करु नये किंवा त्यांना त्रास देऊ नये अशी मागणी भारताने केली आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना भेटण्याची त्यांच्या पत्नीला परवानगी दिली आहे. पण भारत या भेटीआधी बरीच सतर्कता आणि काळजी घेत आहे. पाकिस्तानचा इतिहास लक्षात ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानने फक्त कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी दिली आहे. पण सासूबाईंना म्हणजे कुलभूषण यांच्या आईलाही परवानगी द्यावी अशी त्यांच्या पत्नीची इच्छा आहे. 

दरम्यान भारताने पाकिस्तानकडे कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईच्या सुरक्षेची हमी मागितली आहे. पाकिस्तानात आल्यानंतर दोघींची कुठलीही चौकशी करु नये किंवा त्यांना त्रास देऊ नये अशी मागणी भारताने केली आहे तसेच तुरुंगात कुलभूषण यांना भेटण्याच्यावेळी पत्नीसोबत राजनैतिक अधिका-यालाही जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भारताने केली आहे. मानवीय दृष्टीकोनातून कुलभूषण यांना भेटण्याची त्यांच्या पत्नीला परवानगी देत आहोत असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. 

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात बंद आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. भारताने या निर्णयाला आंतरराष्ट्रीय कोर्टात आव्हान दिले आहे. सध्या हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात आहे. भारताने कुलभूषण जाधव यांच्या विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण केल्यामुळे पाकिस्तानला कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्याचा निर्णय घ्यावा लागला.  

भारतातील निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या 46 वर्षीय जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तानात अटक केल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता. पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भारताने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश गतवर्षी 13 डिसेंबर रोजी दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस स्थगिती देत पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली होती. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान