शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 23:08 IST

कॅनडाच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी या प्रकरणावर संसदीय समितीच्या सुनावणीत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेतले, त्यानंतर भारताने संताप व्यक्त केला.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणाबाबत भारत आणि कॅनडा यांच्यात सुरू असलेला राजनैतिक वाद आणखी वाढला आहे. कॅनडाच्या उप परराष्ट्र मंत्र्यांनी संसदीय समितीच्या सुनावणीत भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचे नाव भारताने अतिशय गांभीर्याने घेतले आहे.या प्रकरणी एक दिवस आधी कॅनडाच्या भारतीय उच्चायुक्ताच्या प्रतिनिधीला परराष्ट्र मंत्रालयात बोलावून भारतावर संताप व्यक्त केला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेव्हिड मॉरिसन यांच्या वरील विधानाला तीव्र विरोध दर्शवणारी डिप्लोमॅटिक नोटही सादर केली आहे. 

आता भारताने पुन्हा एकदा  ट्रूडो सरकार राजकीय अजेंडानुसार काम करत आहे आणि ते उचलत असलेल्या पावलेचा दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम होईल, असा आरोप केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, 'आम्ही काल कॅनडाच्या उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला बोलावले होते. २९ ऑक्टोबर २०२४ ची डिप्लोमॅटिक नोट त्यांना सुपूर्द करण्यात आली आहे. कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी भारताच्या केंद्रीय गृहमंत्र्यांबद्दलच्या समितीसमोर केलेल्या बेताल आणि निराधार संदर्भांना आमचा कडाडून विरोध असल्याचे आम्ही म्हटले आहे.

"भारताची बदनामी करण्यासाठी आणि इतर देशांवर प्रभाव टाकण्यासाठी कॅनडाचे अधिकारी जाणूनबुजून आंतरराष्ट्रीय माध्यमांना निराधार माहिती पुरवतात. अशा बेजबाबदार कृतींचे द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होतील, असेही ते म्हणाले. 

उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांची हेरगिरी केली जात आहे: भारत

जयस्वाल म्हणाले, 'कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केली जात आहे. ही माहिती कॅनडाच्या सरकारनेच भारतीय अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. या संदर्भात कॅनडा सरकारचा हा राजनैतिक करारांचे उघड उल्लंघन असल्याचा अधिकृत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Canadaकॅनडा