शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भारत आणि फ्रान्समधील संबंध ऐतिहासिक - इमँन्युएल मँक्रोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 13:27 IST

या प्रदेशात ( भारतीय उपखंड आणि आशिया) आमच्यासाठी भारत हे प्रवेश करण्याचे स्थान आहे.

नवी दिल्ली: भारत आणि फ्रान्स यांचे संबंध अत्यंत जुने आणि ऐतिहासिक आहेत अशा शब्दांमध्ये भावना व्यक्त करत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमँन्युएल मँक्रोन यांनी आपला भारत दौरा सुरु केला आहे. राष्ट्राध्यक्ष मँक्रोन ४ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज राष्ट्रपती भवन येथे त्यांचे संमारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. मँक्रोन यांचे स्वागत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रपती भवनातील भेटीनंतर मँक्रोन राजघाट येथे रवाना झाले.

इमँन्युएल मँक्रोन आपली पत्नी ब्रिगेट मेरी- क्लाऊड मँक्रोन यांच्यासह काल संध्याकाळी उशिरा भारतात दौऱ्यासाठी दाखल झाले. तसेच काही फ्रेंच उच्चपदस्थ अधिकारी व उद्योजकसुद्धा त्यांच्याबरोबर या दौऱ्यात सामील झाले आहेत. यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी मँक्रोन यांची चर्चा होणार आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ते इंटरनँशनल सोलर अलायन्स या परिषदेत सहभागी होतील. या दौऱ्यामुळे भारत आणि फ्रान्स यांच्यामधील राजकीय, आर्थिक संबंध अधिक वृद्धिंगत होतील असे दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनपत्रात म्हटले आहे. राष्ट्रपती भवनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना मँक्रोन म्हणाले, "दोन्ही देशांच्या सहसंबंधाचे नवे युग आम्हाला सुरु करायचे आहे, भारत फ्रान्सचा नेहमीच पहिल्या क्रमांकाचा सहकारी मित्र राहिला आहे. या प्रदेशात ( भारतीय उपखंड आणि आशिया) आमच्यासाठी भारत हे प्रवेश करण्याचे स्थान आहे तसेच  फ्रान्स हा भारतासाठी युरोपात प्रवेश करण्यासाठी द्वार म्हणून ओळखला जावा अशी आमची इच्छा आहे". जानेवारी २०१६ मध्ये फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकोई ओलांद यांनी भारताला भेट दिली होती. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते भारतात आले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInternationalआंतरराष्ट्रीय