शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

चीन आणि भारतीय लष्कर उद्या येणार आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 18:44 IST

चिनी सैनिकांनी लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला

लेह, दि. 16 - चिनी सैनिकांनी लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्वभुमीवर भारत आणि चीनमधील लष्करी अधिका-यांची बैठक पार पडणार आहे. लेहमधील चुलशूल परिसरात ही बैठक होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील सीमारेषेवर शातंता कायम राहावी यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

डोकलामनंतर चिनी सैनिकांनी लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. मंगळवारी ही घटना समोर आली. भारतीय जवानांनी अटकाव केल्यानंतर चिनी सैनिकांनी दगडफेक केली, यालादेखील भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या घटनेत काही सैनिक जखमी झाले. काही वेळाने चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले.  

भारताच्या स्वातंत्र्यदिनीच चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) सैनिकांनी सकाळी 6 आणि त्यानंतर 9 वाजता भारतीय सीमाभागातील ‘फिंगर फोर’ आणि ‘फिंगर फाइव्ह’ भागात घुसण्याचा प्रयत्न केला होता. यापैकी ‘फिंगर फोर’ भागात प्रवेश करण्यात त्यांना यश आले. मात्र भारतीय जवानांनी अटकाव करत तत्काळ त्यांना माघारी घालवले. सतर्क भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा प्रतिकार केला.  अटकावापुढे काही होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हतबल चिनी सैनिकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांनीसुद्धा या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. 

डोकलाम आणि सिक्कीममध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आल्यानंतर आता लडाखमध्येही अशीच काहीशी परिस्थिती उद्भवली आहे. ‘फिंगर फोर’ हा भाग आपला असल्याचं चीन दावा करत आहे. 1990च्या अखेरीस चर्चेदरम्यान भारताने या भागावर दावा केला होता. मात्र चीनने ‘फिंगर फोर’पर्यंत रस्ता बनवून हा अक्साई चीनचा भाग असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला चिनी सैनिक तलावाच्या उत्तर आणि दक्षिण काठाकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र आता भारताने या भागात सशस्त्र पाहारा ठेवला आहे. अमेरिकेकडून निर्यात केलेली अत्याधुनिक यंत्रणा असलेली व 15 सैनिकांना वाहून नेणारी स्पीडबोटही इथे तैनात करण्यात आली आहे. यापूर्वी 2013 साली लडाखमधील देपसांग व दौलतबेग ओलडी या ठिकाणी चीनने केलेल्या घुसखोरीवेळीही या भागात तणाव निर्माण झाला होता.