शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जगातील ७० टक्के वाघ एकट्या भारतात-जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:37 IST

बुधवारी साजऱ्या होणाºया जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जावडेकर यांनी भारतातील वाघांविषयीचा ‘आॅल अबाऊट टायगर एस्टिमेशन २०१८’ या नावाचा एक अहवाल जारी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगात असलेल्या एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ आता एकट्या भारतात आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले की, भारतात सुमारे ३० हजार हत्ती आणि ५०० सिंहही आहेत.बुधवारी साजऱ्या होणाºया जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जावडेकर यांनी भारतातील वाघांविषयीचा ‘आॅल अबाऊट टायगर एस्टिमेशन २०१८’ या नावाचा एक अहवाल जारी केला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जावडेकर यांनी सांगितले की, १९७३ साली भारतात ९ व्याघ्र अभयारण्ये होती. त्यांची संख्या आता ५० झाली आहे. जगाच्या एकूण जमिनीपैकी फक्त २.५ टक्के जमीन भारतात आहे. मात्र, आपली जैवविविधता ८ टक्के आहे. जगातील फक्त १३ देशांत आता वाघ सापडतात. वाघांच्या संवधर्नासाठी काम करणाºया लोकांना प्रशिक्षण देण्यास भारत तयार आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे काही वर्षांपूर्वी वाघांचे वास्तव्य असलेल्या देशांच्या प्रमुखांची बैठक झाली होती. या बैठकीत २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय झाला होता. याच बैठकीत २९ जुलै हा ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.कॉर्बेट अभयारण्यात सर्वाधिक वाघअहवालातील माहितीनुसार, भारतातील वाघांपैकी सर्वाधिक २३१ वाघ कॉर्बेट अभयारण्यात आहेत. मात्र, मिझोरममधील डम्पा अभारण्य, प. बंगालमधील बक्सा अभयारण्य व झारखंडमधील पलामाऊ अभयारण्य या तीन अभयारण्यांत एकही वाघ उरलेला नाही. भारतात आढळणाºया एकूण वाघांपैकी ६५ टक्के म्हणजेच १,९२३ वाघ अभयारण्यात आहेत.

टॅग्स :Tigerवाघ