शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार; संजय राऊतांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 11:06 IST

आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे.

नवी दिल्ली: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार असून यावेळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करु शकते, असं सांगण्यात येत आहे. 

२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाच्या निवडणुका या लोकसभेबरोबरच होणार असल्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. कारण आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत या पाच राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

आगामी ५ राज्यांच्या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितले आहे. तसेच पाचही राज्य २०२४च्या लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. पाचही राज्यात आम्ही विजयी होऊ. छत्तीसगड आणि राजस्थान आमच्याकडे आहे. मध्य प्रदेश जिंकलो होतो, तेलंगणा जिंकण्याची खात्री असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. १४ महानगरपालिकांच्याही निवडणुका जाहीर करा, असं आवाहन देखील संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला केलं आहे. 

छत्तीसगडमध्ये ९० जागांसाठी मतदान-

छत्तीसगडमधील ९० जागांसाठी मतदान होणार आहे. छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे. शेवटच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आणि भूपेश बघेल राज्याचे मुख्यमंत्री झाले.

मिझोरमच्या ४० जागांवर मतदान-

या वर्षाच्या अखेरीस ४० जागांसह मिझोरममध्येही निवडणुका होणार आहेत. मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबर २०२३ रोजी संपत आहे. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या, ज्यामध्ये मिझो नॅशनल फ्रंटने विजय मिळवला आणि राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर झोरमथांगा मुख्यमंत्री झाले.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीSanjay Rautसंजय राऊतCentral Governmentकेंद्र सरकारElectionनिवडणूक