शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 04:53 IST

विस्थापित झालेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत उभारणे आवश्यक आहे, असे त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

श्रीनगर : विस्थापित झालेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत उभारणे आवश्यक आहे, असे त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, काश्मीरमधील एकाही प्रमुख नेत्याने काश्मिरी पंडितांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण आजवर दिलेले नव्हते.या पंडितांना सुरक्षा पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम आम्ही करणार आहोत. या पंडितांची घरे बळकावणाऱ्यांनी आता त्यांना पुन्हा तेथे राहायला येण्यासाठी बोलावले पाहिजे. असे होण्याकरिता फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, तसेच हुरियत नेत्यांनी काश्मिरीमधील इतर लोकांना राजी केले पाहिजे. हे माझे काम नाही तर काश्मीरमधील नेत्यांनी हे करणे अपेक्षित आहे. काश्मिरी पंडितांना त्यांच्याच राज्यात पर्यायी घर, शाळा व सुरक्षा मिळावी इतकाच आमचा प्रयत्न आहे. काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती स्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी पुलवामा व अन्य काही ठिकाणांचा आम्ही विचार चालविला आहे. काश्मिरी पंडितांना हव्या त्या ठिकाणी या वसाहती उभारून तेथे त्यांना मोफत घरे देण्यात येतील.>अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींनी विश्वास गमावलाराज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, ओमर असो वा फारुक अब्दुल्ला यांच्या पक्षाला दोन ते अडीच टक्के मतदान होते. मेहबुबा मुफ्ती यांच्या मतदारसंघात फक्त २ टक्केच मतदान झाले. श्रीनगरमध्ये फारुक अब्दुल्ला अगदी कमी मताधिक्याने निवडून येत असत.पूर्वी तिथे ६ टक्के मतदान होत असे. आता फारुक अब्दुल्ला १० ते १२ टक्के मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. हे सर्व काश्मिरी नेते स्थानिक जनतेचा विश्वास गमावून बसले आहेत. काश्मीरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे हुरियत नेते मिरवाईज यांनी म्हटले होते. त्याबाबत मी नव्हे तर केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे.