शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:लाच मारण्यासाठी 'तो' देतोय मतदारांना चप्पल; उमेदवाराची भन्नाट शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 16:55 IST

हटके प्रचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हैदराबाद: तेलंगणामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार अगदी जोरात सुरू आहे. मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्याचं काम उमेदवारांकडून केलं जात आहे. मात्र यातही एका अपक्ष उमेदवाराचा निवडणूक प्रचार सर्वात लक्षवेधी ठरत आहे. सर्व उमेदवार मतदारांच्या दारोदारी जाऊन हात जोडत असताना एक उमेदवार सर्व मतदारांच्या हाती चपला देत आहे. जिंकून आल्यावर काम केलं नाही, तर याच चपलांनी मारा, असं हा उमेदवार मतदारांना सांगत आहे. तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातल्या कोरातला मतदारसंघातून अकुला हनुमंत विधानसभा निवडणूक लढवत आहेत. अकुला हनुमंत अपक्ष उमेदवार आहेत. मतदारांना दिलेली आश्वासनं आपण नक्की पूर्ण करणार असल्याचं हनुमंत सांगतात. 'मतदार मला नक्की मतं देतील, असा मला विश्वास आहे. निवडणूक आल्यावर मी सर्व आश्वासनं पूर्ण करेन. त्यासाठी मी घरोघरी जाऊन मतं मागत आहे. मी तुम्हाला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करेन, असा विश्वास मी जनतेला देत आहे. दिलेला शब्द न पाळल्यास, मी दिलेल्या चपलेनंच मला मारा, असं मी मतदारांना सांगत आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. सध्या अकुला हनुमंत मतदारसंघातल्या घराघरांमध्ये जात आहेत. मतदारांच्या हाती चप्पल देणाऱ्या हनुमंत यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी प्रचाराचा हा हटके व्हिडीओ शेअर केला आहे. तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. यानंतर ११ डिसेंबरला निकाल जाहीर होईल.

 

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018Electionनिवडणूक