शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

'या' घटनांनी स्वातंत्र्यलढ्याला दिली कलाटणी अन् इंग्रजांची झाेप उडविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 06:44 IST

Independence Day : काही चळवळींनी इंग्रजांची झाेप उडविली, तर काही घटनांमध्ये भविष्यातील काही घडामाेडींची बीजे पेरली गेली हाेती. त्यांचा हा थाेडक्यात आढावा.

स्वातंत्र्यलढ्यात काही घटना महत्त्वाच्या ठरल्या. त्या एकूणच स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी देणाऱ्या हाेत्या. काही चळवळींनी इंग्रजांची झाेप उडविली, तर काही घटनांमध्ये भविष्यातील काही घडामाेडींची बीजे पेरली गेली हाेती. त्यांचा हा थाेडक्यात आढावा.

लखनौ करार (डिसेंबर १९१६)लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मोहंमद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेला लखनौ करार १९ डिसेंबर १९१६ रोजी काँग्रसेच्या लखनौ अधिवेशनात मंजूर करण्यात आला. हा करार भारत सरकारची संरचना आणि हिंदू आणि मुस्लीम समुदायाशी संबंधित होता. काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनाने मवाळ आणि जहालवादी गट एकत्र आल्याने राष्ट्रीय चळवळीला (खिलाफत, असहकार) बळ मिळाले. १९०६ मध्ये मुस्लीम लीगची स्थापना करून मुस्लीम समुदायासाठी विभक्त मतदारसंघ आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली हाेती. या करारामुळे हिंदू आणि मुस्लीम समुदायाचे ऐक्य साधण्याचा हा कराराचा मूळ उद्देशच नाहीसा झाला.

‘उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया’मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर लावलेल्या कराच्या विरोधात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केलेला मिठाचा सत्याग्रह आणि त्यासाठी काढलेली दांडी यात्रा यामुळे ब्रिटिश साम्राज्य चांगलेच हादरले. साबरमती आश्रमातून १२ मार्च १९३० रोजी सुरू झालेली दांडी यात्रा ३८५ किलोमीटरचे अंतर पायी पार करून ६ एप्रिल १९३० रोजी दांडी येथे समुद्रकिनारी पोहोचली. त्या दिवशी सकाळी गांधीजींनी मूठभर मीठ उचलून सविनय कायदेभंग केला. दांडीनंतर गांधीजी सभांमध्ये भाषणे करीत समुद्रकिनाऱ्याने दक्षिणेकडे आगेकूच करीत राहिले. धारसणा येथे काँग्रेसने सत्याग्रह करण्याचे ठरवले होते; परंतु तत्पूर्वी ४-५ मे १९३० च्या दरम्यान गांधीजींना अटक करण्यात आली. या सत्याग्रहामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले. 

असहकार चळवळजालियनवाला बाग हत्याकांडासह अन्य घटनांच्या पार्श्वभूमीवर इंग्रजांची जुलमी राजवट अंहिसेच्या मार्गाने उखडून टाकण्यासाठी काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ५ सप्टेंबर १९२० रोजी असहकार चळवळ सुरू केली. काँग्रेसच्या १९२० च्या कोलकाता अधिवेशनात महात्मा गांधींनी असहकाराचा ठराव मांडला होता. शासनाचे सभा-समारंभ, सरकारी शाळा-महाविद्यालये, न्यायालये, निवडणुकांवर बहिष्कार. इंग्रजांची नोकरी, पदव्या, पदांचा त्याग. परदेशी मालाची होळी, अशी ही असहकार चळवळीची सूत्रे कमालीची मारक ठरली. काँग्रेसने निवडणुकांवर, अनेक वकिलांनी न्यायालयांवर, तर प्राध्यापकांसह हजारो विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयांवर बहिष्कार घातला. असहकाराचे लोण वाढत जाण्याच्या चिंतेने इंग्रजांची झोप उडाली. सरकारने ४० हजार कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले. त्यामुळे असंतोष आणखी वाढला. तो कमी करण्यासाठी इंग्लंडचे राजपुत्र आले. त्यांच्या मुंबई दौऱ्यावर जनतेने बहिष्कार घातला. 

१९४६ मधील नौसैनिकांचे बंडमुंबई आणि कराचीत १९४६ मध्ये झालेला नौसैनिकांचा उठाव हा देशाच्या स्वातंत्र्ययुद्धातील मैलाचा दगड ठरला. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास नौसैनिकांच्या उठावाचा उल्लेख न करता पूर्ण होऊच शकत नाही. भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही, असे या घटनेने ब्रिटिशांना लक्षात आणून दिले. बी. सी. दत्त हे नौसैनिकांच्या या बंडाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. दुसऱ्या महायुद्धात विजयी झालेल्या ब्रिटिश नौदलात आपणास कसलेच स्थान नाही, ही भावना या उठावास कारणीभूत ठरली. २ फेब्रुवारी १९४६ ला ‘तलवार’ या बोटीला सरसेनापती भेट देणार होते. ते ज्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून सलामी घेणार होते, त्या लाकडी प्लॅटफॉर्मवर जय हिंद आणि क्विट इंडिया या घोषणा रंगविलेल्या होत्या. यात बी. सी. दत्त यांचाच पुढाकार आहे, हे आढळून आल्यानंतर दत्त यांना अटक करण्यात आली. त्यानंतर १८ फेब्रुवारी १९४६ ला सकाळी सर्व नौसैनिकांनी विद्राेह केला. १९ फेब्रुवारीला विद्रोह करणाऱ्यांची संख्या २० हजारांवर पोहोचली. हळूहळू हे लाेण पसरले. मुंबई, कोलकाता, कराची आणि अन्य ठिकाणच्या ७८ युद्धनौकांवरील नौसैनिकांनी बंड केले. हे बंड मुंबईत सहा दिवस, कोलकात्यात सात दिवस, कराचीत दोन दिवस आणि मद्रासमध्ये एक दिवस चालू होते. हा उठाव दडपून टाकण्यासाठी सरकारने सैन्य बोलाविले. मुंबईच्या रस्त्यावरून रणगाडे धडधडू लागले. मुंबईतील लोकांनी खाद्यपदार्थांचे पुडे घेऊन गेट वे ऑफ इंडियाकडे धाव घेतली आणि नाैसैनिकांना मदत केली. महात्मा गांधीजी यांच्या सूचनेनंतर सरदार पटेल यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर बंड २३ फेब्रुवारी १९४६ ला अखेर शांत झाले. या काळात ३०० लोक मृत्युमुखी पडले, तर १५०० लोक जखमी झाले.

(संकलन : सुमंत अयाचित, विलास शिवणीकर, गजेंद्र बिराजदार, सुधाकर त्रिभुवन)

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन