शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day : देशभरात 72व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 06:18 IST

भाजराचा 72 वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्तव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित होणार आहे.

नवी दिल्ली - भाजराचा 72 वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्तव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित होणार आहे. यावेळी देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात राजभवनामध्ये राज्यपालांच्या हस्ते तर विधिमंडळ परिसरात मुख्यमंत्र्याच्या हस्ते ध्वजवंदन होईल. अन्य महत्त्वाच्या नेत्यांमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह भाजपा मुख्यालयात, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करतील. स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला संसद, राष्ट्रपती भवन, तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह विविध ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.  स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व महत्त्वाची ठिकाणे, रेल्वे स्थानक, गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. नागरिकांनी अफवेला बळी न पडता स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करावा, संशयास्पद वस्तू, व्यक्तीबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले. आंदोलने, मोर्चे, नालासोपाऱ्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या स्फोटकांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता बाळगण्याच्या सूचना आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह जलद प्रतिसाद दल श्वानपथक, बीडीडीएसचे पथक गस्त घालत आहेत.

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसIndiaभारत