उद्याचा १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या तमाम भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे. भारताला इंग्रजांच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळाले होते. अगणित लाखो स्वातंत्र्यवीरांनी भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त केले होते. आज या घटनेला ७८ वर्षे होत आहेत. उद्या देशभरात गोडधोड, जिलेबी वाटली जाणार आहे. उद्याचा दिवस आणखी एका कारणाने खास आहे. कारण तो योग जुळून येण्यासाठी ७८ वर्षे लागली आहेत.
भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा १५ ऑगस्ट, १९४७ ला तोच वार होता जो उद्या १५ ऑगस्टला असणार आहे. शुक्रवारीच आपला देश स्वातंत्र्य अनुभवत होता. हा योगायोग जुळून येण्यासाठी ७८ वर्षे जावी लागली. दरवर्षी स्वातंत्र्यदिन येतो, पण यावेळचा या योगामुळे खूप खास असणार आहे.
भारतीय लोक हा दिवस उत्साहात साजरा करतात, शैक्षणिक संस्था, कार्यालये आणि सरकारी आस्थापनांमध्ये ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
यंदाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन की ७९ वा...दरवर्षी आपला गोंधळ उडतो की यंदाचा स्वातंत्र्यदिन हा नेमका कितवा आहे. या वर्षीचेच घ्यायचे झाले तर यंदाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन आहे. परंतू भारत स्वतंत्र होऊन ७८ वर्षे झाली आहेत. पहिल्याच दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा झाल्याने तो स्वातंत्र्य मिळून जेवढी वर्षे झाली त्याच्यापेक्षा एकने जास्त आहे. अशाप्रकारे २०२५ मध्ये, भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल.