शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'सैनिक सर्जिकल स्ट्राइक-एअरस्ट्राइक करतात, तेव्हा तरुणांची...'; PM मोदींनी लाल किल्ल्यावरून सांगितले जनतेचे स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 08:58 IST

Independence Day 2024 : पंतप्रधान मोदी ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते...

PM Narendra Modi Independence Day 2024 : आपल्या देशात दहशतवादी हल्ले करून निघून जात होते. मात्र, जेव्हा देशाचे जवान सर्जिकल स्ट्राइक करतात, एअरस्ट्राइक करतात तेव्हा तरुणांची छाती गर्वाने फुलते. अशाच गोष्टी देशवासियांना भारावून टाकत असतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते.

राष्ट्रहित सर्वोपरी मानून सुधारणा केल्या -मोदी म्हणाले, "जेव्हा आम्हाला जबाबदारी मिळाली, तेव्हा आम्ही मोठ्या सुधारणा केल्या. आम्ही बदल घडवून आणण्यासाठी रिफॉर्म स्वीकारले. आमचे कौतुक व्हावे म्हणून आम्ही सुधारणा करत नाही. आम्ही 'मजबूरी'म्हणून नाही, तर मजबूती देण्यासाठी सुधारणा करत आहोत. आम्ही राजकारणासाठी सुधारणा करत नाही. आमचा केवळ एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे, नेशन फर्स्ट, अर्थात राष्ट्रहित सुप्रीम. माझा देश महान बनावा, हाच संकल्प घेऊन आम्ही पुढे जात आहोत.

जगात भारताचा मान वाढला - पंतप्रधान म्हणाले, लोकांना स्वातंत्र्यतर मिळाले, मात्र त्यांना प्रत्येक सुविधा मिळवण्यासाठी सरकारपुढे हात पसरावे लागत होते. आज सरकार घरा-घरापर्यंत नळाने पाणी आणि गॅस सिलिंडर पोहोचवत आहे. जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे.

दहा वर्षे इंफ्रास्ट्रक्चरवर काम करण्यात आले -पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या एका दशकात रस्ते, रेल्वे, हायवे, शाळा-कॉलेज, रुग्णालये, मेडिकल कॉलेज, अमृत सरोवर, दोन लाख ग्राम पंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर, चार कोटी पक्की घरे तयार करून इंफ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आले.

...अशी आहेत देशातील जनतेची मोठी स्वप्ने -विकसित भारतासाठी जनतेकडून मागवण्यात आलेल्या सूचनांसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "आम्ही विकसित भारत 2047 साठी देशवासीयांकडून सूचना मागवल्या आहेत. मिळालेल्या अनेक सूचना आपल्या जनतेची स्वप्ने आणि आकांक्षा दर्शवणाऱ्या आहेत. काही लोक म्हणत आहेत, भारत कौशल्याची राजधानी व्हावा, काही लोकांचे म्हणणे आहे की, भारत उत्पादन केंद्र व्हावा, तो आत्मनिर्भर वाहा. काहींचे म्हणणे आहे, ग्रीनफिल्ड शहरे बनवावीत, भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन असावे, अशी आहेत देशातील जनतेची मोठी स्वप्ने. यामुळे आपला आत्मविश्वास एका नव्या उंचीवर पोहोचतो आणि अधिक दृढ होतो.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिनRed Fortलाल किल्लाSoldierसैनिक